नाशिक: सलग हजेरीनंतर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २९) पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. पण, प्रमुख धरणांमधून विसर्ग सुरूच असून, हवामान विभागाने शनिवारी (ता. ३०) जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यानंतर पुढील चार दिवस हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. पंधरवड्यापासून जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकला. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला.