जुने नाशिक : प्लॅस्टिक बंदी केवळ नावालाच | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक : बाजारपेठेत दैनंदिन कामातून निघालेला प्लास्टिक पिशव्यांचा कचरा

प्लॅस्टिक बंदी केवळ नावालाच

जुने नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर होत आहे. यामुळे प्रदूषणयुक्त प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. महापालिकेस प्लॅस्टिक बंदीचा विसर पडल्याने प्रदूषण आणि स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.

नदीचे प्रदूषण, वातावरण प्रदूषित, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतो. त्या अनुषंगाने राज्य सरकार व महापालिकेने काही वर्षांपूर्वी प्लॅस्टिक बंदीचे आदेश पारित केले आहेत. प्लॅस्टिक पिशवी, कापड, थर्माकोल, अशा विविध प्लॅस्टिकयुक्त वस्तुंचा वापर व खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे. असे असताना बाजारपेठेत विविध कामांसाठी प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. त्यातून प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरातून निघणारा प्लॅस्टिक कचरा रात्री कचराकुंडीवर टाकून देण्यात येतो.

हाच कचरा पावसाळ्यात जमिनीत कुजून रोगराई वाढते. नदी, नाल्यात प्लॅस्टिक कापडाचा कचरा अडकून गटारी तुंबतात. बाजारपेठेतील रहिवासी भागात पावसाचे पाणी साचून पुराचे स्वरूप येते. त्यातून अनेक व्यवसायिकांचे नुकसानही होते. सर्वाधिक नदी प्रदूषण प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचऱ्याने होते. नागरिकांकडून निर्माल्य नदीत अर्पण करण्यासाठी प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जातो. परराज्यातून येणारे पर्यटक प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याने तो कचराही नदी परिसरासह पर्यटनस्थळी फेकला जातो.

कचरा नाशवंत नसल्याने कालांतराने त्यातूनच प्रदूषण होते. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. इतकेच नाही, तर कचराकुंडीवर चरण्यासाठी येणारे मोकाट जनावरे नकळत प्लॅस्टिक कचरा खातात. त्यातून विविध विकार होऊन व गळ्यात प्लॅस्टिक अडकून जनावरांना प्राणास मुकावे लागते. प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी होणे काळाची गरज आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेचे विभागीय कार्यालयांकडून प्लास्टिक बंदीसंदर्भातील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. बाजारात सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. भविष्यात याचा मोठा परिणाम नागरिकांना भोगावा लागण्याची शक्यता आहे.

नावालाच बंदी...
राज्य सरकार आणि महापालिकेकडून प्लॅस्टिक बंदीचा आदेश केवळ नावालाच असल्याचे भासत आहे. सर्रास प्लॅस्टिक पिशवी व विविध प्लॅस्टिकचा वापर होत आहे. महापालिकेने प्लॅस्टिक वापरावर बंदी आणावी व वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Raises The Issue Of Polluted Plastic Waste Due To Plastic Used Increase City In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiknmcPlastic Bag
go to top