esakal | मतदारांना पर्याय नकोचं; एक सदस्यीय प्रभाग पध्दतीच योग्य : राज ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray

मतदारांना पर्याय नकोचं; एक प्रभाग पध्दतच योग्य : राज ठाकरे

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : बहुसदस्यीय प्रभाग समितीतून मतदारांसमोर तीन-चार पर्याय ठेवण्यापेक्षा एक सदस्यीय प्रभाग समिती पध्दत असावी असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त करत शहर विकासासाठी हेचं योग्य असल्याचा दावा केला. (one-ward-one-member-system-is-correct-Raj-Thackeray-political-news-jpd93)

राज ठाकरेंच्या बैठकांमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. कोरोनामुळे (Corona virus) लॉकडाऊन (Lockdown) असल्याने मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला नाही. गेल्या महिन्यात राज ठाकरे नाशिक मध्ये आले होते. परंतु त्यावेळी खासगी कार्यक्रम असल्याने वेळ देता आला नाही. परंतु दोन दिवसांपासून संघटना मजबुत करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या बैठकांमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. दरम्यान २७ जुलैला पुन्हा राज ठाकरे नाशिक मध्ये येणार असून त्यावेळी देखील संघटना बांधणीसाठी बैठका घेणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. सांयकाळी माध्यम प्रतिनिधींशी औपचारीक गप्पा मारताना ते म्हणाले, स्थानिक व एकचं लोकप्रतिनिधी असेल तर प्रभागाचा योग्य प्रकारे विकास साधता येतो. मतदारांना एकाच प्रभागासाठी चारदा मतदान करण्यास भाग पाडणे योग्य नाही.

शॅडो कॅबिनेट पुन्हा पुनर्जिवित करणार

महाविकास आघाडी सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी मनसेच्या वतीने शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली होती परंतू लॉकडाऊन मुळे कॅबिनेटला हवे तसे काम करता आले नाही. नियुक्त केलेल्या शॅडो कॅबिनेटने चांगले काम केले परंतू लोकांपर्यंत ते पोहोचले नसल्याचा दावा करत शॅडो कॅबिनेट पुन्हा पुनर्जिवित करण्याचे संकेत राज ठाकरेंनी दिले.

राज ठाकरे राज्यव्यापी दौऱ्यावर

रविवारी नाशिक मधील दौरा आटोपता घेत पुणे येथे ठाकरे बैठकांना हजेरी लावणार आहे. त्यानंतर मुंबई पुढे ठाणे येथे संघटनात्मक बैठका घेतील. शहापूर येथे मनसेची शाखा अतिक्रमित ठरवून बंद करण्यासाठी स्थानिक प्रशासन पोहोचले, त्यावेळी पक्षाची सदस्य नसताना एका महिलेने पुढाकार घेत शाखा वाचविली होती. त्यामुळे शहापुर येथील त्या महीलेची ते भेट घेणार आहेत.

प्रकल्प वाचविण्याची जबाबदारी नाशिककरांची

मनसेच्या सत्ता काळात राज ठाकरे यांच्या प्रयत्नातून रिंगरोड, बोटॅनिकल गार्डन, संगीत कारंजा, शस्र संग्रहालय, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण आदी महत्वाचे प्रकल्प सामाजिक दायित्वाच्या निधीतून झाले. या प्रकल्पांची दुर्दशा झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पालिका प्रशासनाला अनेकदा कळविण्यात आले. परंतू पक्षीय राजकारणामुळे दुर्लक्ष केल्याचे सांगताना ठाकरे यांनी प्रकल्पांचे संर्वधन करण्याची जबाबदारी नाशिककरांची देखील असल्याचे मत व्यक्त केले. प्रकल्पांची वाताहात करणाऱ्यांचा नाशिककरांनी मतदानावेळी विचार करावा, मतदान करताना लक्ष्मीदर्शना सारखे प्रकार होत असतील तर यापेक्षा वेगळे काय होणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

(one-ward-one-member-system-is-correct-Raj-Thackeray-Nashik-political-news)

हेही वाचा: सावकी येथे नियतीचा आघात; भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

हेही वाचा: मनविसेची जबाबदारी दिल्यास स्विकारणार - अमित ठाकरे

loading image