Devendra Fadnavis
sakal
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युती निश्चित झालेली असताना ठाकरे बंधूंची बुधवारी (ता. १०) भेट झाली. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला असून, त्यांच्या भेटीत काय चर्चा झाली हे समजण्याचे तंत्रज्ञान माझ्याकडे नाही. माझी दोघांपैकी कुणासोबतही चर्चा झालेली नसल्याचे सांगत त्यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले.