MNS and UBT Shiv Senasakal
नाशिक
Nashik Politics : शिवसेना-मनसे पुन्हा एकत्र? हिंदी मुद्द्यावर ठरतो निर्णायक मोर्चा
MNS and UBT Shiv Sena Join Forces Against Hindi Imposition : हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नाशिक- शालेय शिक्षणात हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ५ जुलैला हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केली असून, त्याच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात बैठक झाली. मनसे सैनिकांनी हिंदी सक्तीला कडाडून विरोध करण्याचा निर्धार केला.
