

Dhule Family Road Accident in Rajasthan Nine Killed and Six Injured After Cruiser Crashes Into Parked Truck Near Shambhupura
sakal
चिमठाणे/धुळे : राजस्थानहून देवदर्शनानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या अमराळे (ता. शिंदखेडा) येथील पवार कुटुंबावर आज काळाने घाला घातला. कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ पहाटे दोनच्या सुमारास क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये धुळे शहरातील शांतिगीतनगर येथील चौघे, नवनाथनगर येथील दोघे आणि शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील तिघांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली. एकाच वेळी नऊ आप्तस्वकीय गमावल्याने अमराळेसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.