बिटको तोडफोड प्रकरण : फरार राजेंद्र ताजणे अखेर पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bytco Hospital

बिटको तोडफोड प्रकरण : फरार राजेंद्र ताजणे अखेर पोलिसांच्या ताब्यात

नाशिक रोड : मागील अडीच महिन्यापासून बिटको हॉस्पिटल तोडफोडप्रकरणी फरार असलेला राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे अखेर मंगळवारी (दि.८) नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला.

कोरोना काळात बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाही म्हणून नगरसेविका सीमा ताजणे त्यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी १५ मे रोजी नवीन बिटको रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशवराच्या काचेमधून ईनोवा गाडी घुसवूनन मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. सदरची घटना घडल्यानंतर ताजने हे फरार झाले होते. दरम्यान ही घटना संपूर्ण राज्यात गाजली होती घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी इनोवा कार जप्त केली होती परंतु ताजणे ते फरार होते.

अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी ताजने यांनी हायकोर्टात अर्ज केला होता परंतु हायकोर्टाने सदरचा जामीन फेटाळला होता दरम्यान नाशिक रोड पोलिसांनी राजेंद्र ताजने यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही अखेर ताजणे हे मंगळवार (ता.२) रोजी सायंकाळी नाशिकरोड पोलीस स्थानकात स्वतःहून शरण आले त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: नाशिक : खासगी लॅबचालकांना डेंगीचा अहवाल कळविणे बंधनकारक

हेही वाचा: नाशिकमध्ये हेल्मेट अभावी ५ वर्षात ३९४ बळी!

Web Title: Rajendra Tajne Who Was Vandalizing Bytco Hospital Appeared At The Police Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top