Rajya Balnatya Spardha : नाशिक विभागात अहमदनगरची बाजी ‘अजब लोट्यांची महान गोष्ट’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi balnatya spardha file photo

Rajya Balnatya Spardha : नाशिक विभागात अहमदनगरची बाजी ‘अजब लोट्यांची महान गोष्ट’ प्रथम

नाशिक : १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर या संस्थेच्या ‘अजब लोट्यांची महान गोष्ट’ या नाटकाला प्रथम पारितोषिक, तसेच समिज्ञा बहुउद्देशीय संस्था, नाशिक या संस्थेच्या ‘बदला’ या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि आत्मा मालिक, कोकमठाण, या संस्थेच्या ‘आम्ही ध्रुव उद्याचे’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या तिन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. (Rajya Balnatya Spardha Ahmednagar ajab lotyanchi mahaan gosht First in Nashik Division nashik news)

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक विभागातील निकाल पुढीलप्रमाणे : दिग्दर्शन प्रथम पारितोषिक आरती अकोलकर (नाटक- अजब लोट्यांची महान गोष्ट), द्वितीय पारितोषिक पूनम पाटील (नाटक- बदला), तृतीय पारितोषिक- सुजित जोशी (अद्‌भुत बाग).

प्रकाशयोजना प्रथम पारितोषिक चेतन ढवळे (नाटक- बदला), द्वितीय पारितोषिक गणेश लिमकर (नाटक- एक रात्र गडावर), नेपथ्य- प्रथम पारितोषिक ऋषिकेश पाटील (नाटक- झुंझार), द्वितीय पारितोषिक प्रवीण नेरके (नाटक- सुखी सदऱ्याचा शोध), रंगभूषा- प्रथम पारितोषिक दीपाली अडगटला (नाटक- एक रात्र गडावर), द्वितीय पारितोषिक माणिक कानडे (नाटक- चिमटा).

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Nashik News : अखिल भारतीय लोककला साहित्य संमेलनाचे उत्साहात उद्घाटन! पाहा Photos

उत्कृष्ट अभिनय - रौप्यपदक श्लोक नेरकर (नाटक- बदला) व गायत्री रोहोकले (नाटक- अजब लोट्यांची महान गोष्ट). अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- अनुजा कुलाळ (नाटक- हे जीवन सुंदर आहे), निकिता वरखडे (नाटक- दप्तर), आर्या देखणे (नाटक- अजब लोट्यांची महान गोष्ट), ईश्वरी बकरे (नाटक- तहानलेली), मनस्वी लगड (नाटक- सुखी सदऱ्याचा शोध), सम्यक सुराणा (नाटक- अजब लोट्यांची महान गोष्ट), आर्यन बोलीज (नाटक- बदला), सौरभ क्षीरसागर (नाटक- अभिप्राय), भार्गव जोशी (नाटक- झुंझार), वीर दीक्षित (नाटक- अद्‌भुत बाग).

३ जानेवारी ते ९ जानेवारी कालावधीत माऊली सभागृह, अहमदनगर व परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण ३० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शंकर घोरपडे, गणेश शिंदे आणि मंजूषा जोशी यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: Nashik News : येसगावच्या ॲपल बोरांना काठमांडूत मागणी!

टॅग्स :Nashikdramachildren