Nashik News : येसगावच्या ॲपल बोरांना काठमांडूत मागणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anand Thackeray sorting apple bore

Nashik News : येसगावच्या ॲपल बोरांना काठमांडूत मागणी!

येसगाव (जि. नाशिक) : येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष, पेरू, टरबूज, डाळिंब सारखी फळे यापूर्वीच परप्रांतात पाठविले आहेत. या सर्वांवर ॲपल बोराने आघाडी घेतली आहे.

येथील हिरवी टपोरी, खाण्यास चवदार, ग्राहकांना भुरळ घालणारी अशी कोकोनट ॲपल बोरं सुरत, उज्जैन, इंदूरकडे ही जात आहेत. केवळ परराज्यातच नव्हते तर नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथे देखील मोठ्या प्रमाणात या बोरांची मागणी होत आहे. (Yesgaon apple bors in demand in Kathmandu Nashik News)

येथील आनंद ठाकरे या युवकाने पाच वर्षापासून तीन एकर शेतात ॲपल बोराची लागवड केली आहे. कमी पाण्यात हमखास उत्पन्न देणारे हे फळपीक आहे. थंडीचा हंगाम सुरू झाला की बोरे बाजारात दाखल होतात. झाड छाटणीच्या सहा महिन्यानंतर बहार येतो. तो सरासरी तीन महिने चालतो.

ठाकरे यांनी शेतात एकरी २०० झाडे लावले असून ठिबकद्वारे पाणी दिले जाते. सहा महिन्यात सरासरी १२ ते १३ हजार रुपये खर्च येतो. व्यापारी बांधावर बोरं घेण्यासाठी येतात. झाडावरून बोर तोडणी शेतकऱ्याकडून केली जाते. बोरांची दहा किलो खोके पॅकिंग व्यापारी करतो. सुरवातीला किलोचा भाव १६ रुपये होता.

मात्र संक्रांतीच्या सण आल्यामुळे मागणी वाढल्याने तो भाव २० रुपये किलो झाला. चार किंवा दोन दिवसात बोरे तोडावी लागतात. एका झाडावर १२० किलो पेक्षा जास्त माल निघतो. या पिकामुळे ठाकरेंच्या कुटुंबाला चांगला आर्थिक हातभार देखील लागला आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Nashik News : राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची आशिमा मित्तलांकडून झाडाझडती!

ॲपल बोरं का खावे

तज्ज्ञांच्या मते बोराच्या खाद्य भागात ८१.६% जलाश , ०.८% प्रथिने, ०.३. स्निग्धता, १७% शर्करा, खनिजे व क जीवनसत्त्व, कॅल्शिअम, फॉस्फरस, आणि लोह संत्रे व सफरचंदा पेक्षा जास्त. पोषणाच्या दृष्टीने सफरचंद पेक्षा बोर चांगले आहे.

"एकरी उत्पादन चार लाखापेक्षा जास्त पाहिजे होते. मात्र हवामान व बेमोसमी पावसाचा फटका बसल्यामुळे ते निम्म्याने कमी झाले आहे. मागील वर्षी असाच फटका बोर पिकाला बसला होता. बागेवर एकरी १ लाख खर्च होतो.' " - आनंद ठाकरे, युवा शेतकरी, येसगाव खुर्द

हेही वाचा: Nashik News : अखिल भारतीय लोककला साहित्य संमेलनाचे उत्साहात उद्घाटन! पाहा Photos

टॅग्स :NashikFruit