उपनगर- नांदेड ते मुंबईदरम्यान दररोज धावणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसच्या बोगी संख्येत वाढ करावी, अशी मागणी जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांकडून केली जात होती. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, पाच वाढीव बोगी आता या गाडीला जोडल्या जाणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होईल.