Raksha Bandhan 2022 : पावसामुळे रक्षाबंधन खरेदीवर फिरले पाणी

rain latest marathi news
rain latest marathi newsesakal

जुने नाशिक : रक्षाबंधन खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसाने एकच तारांबळ उडवली. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने नागरिकांच्या खरेदीच्या आनंदासह व्यवसायिकांच्या आनंदावर पाणी फेरल्याने त्यांच्यात नाराजी दिसून आली. (Raksha Bandhan 2022 Raksha Bandhan shopping plan fails due to rains nashik Latest Marathi News)

rain latest marathi news
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे नाशिकला उद्या साधणार संवाद

कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त सण साजरे केले जात आहे. रक्षाबंधन सणामुळे नागरिकांमध्ये उत्साह होता. गुरुवारी (ता. ११) रक्षाबंधन होणार असल्याने आदल्या दिवशी बुधवारी (ता. १०) नागरिकांनी विशेषतः महिला वर्गाने राखी खरेदी करण्यासह विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.

परंतु, सकाळी अचानक सुरू झालेला पाऊस दिवसभर सुरू राहिल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अनेक जण खरेदी न करता माघारी फिरले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सूर पसरले.

संपूर्ण बाजारपेठेत काही वेळातच शुकशुकाट पसरलेला दिसून आला. तर, काही ठिकाणी पावसाच्या उघडिपीमुळे तुरळक नागरिक खरेदी करताना दिसले. फेरी व्यावसायिकांनी पावसापासून बचावासाठी त्यांच्या दुकानांवर जम्बो छत्री लावूनदेखील बहुतांशी माल पावसाने ओला झाला.

यंदाच्या सणात चांगली खरेदी होईल, अशी आशा व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात होती. घडलेही तसेच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दीही केली. परंतु, दिवसभर सुरू असलेल्या पावसाने दोघांच्याही आनंदावर पाणी फेरल्याचे चित्र बघावयास मिळाले.

rain latest marathi news
उत्तर महाराष्ट्रात ध्वजवितरण : 36 लाख 4 हजार 994 राष्ट्रध्वजांचे वितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com