Rakshabandhan 2023 : डिजिटल युगातही टपालाचे महत्त्व कायम! भाऊरायापर्यंत राखी पोचवण्यासाठी बहिणींकडून पसंती

Crowd at post office counter for Rakhi parcels
Crowd at post office counter for Rakhi parcels esakal

Rakshabandhan 2023 : भाऊ- बहिणीच्या नात्याची डोर घट्ट करण्याची टपाल विभागाची परंपरा डिजिटल युगातही टिकून आहे. दूरवर असलेल्या भाऊरायापर्यंत राखी पोचवण्यासाठी बहिणींकडून आजही टपाल विभागास पसंती दिली जात आहे.

यंदाही राखी पाठवण्यासाठी महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दैनंदिन सुमारे ५०० रजिस्टर आणि स्पीड पोस्ट टपाल विभागातून होत आहे. ३०० स्पीडपोस्ट, तर २०० रजिस्टर पोस्टचा समावेश आहे.

सन सनावळी शुभेच्छा देण्यासाठी सध्या डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. (Raksha Bandhan 2023 people preferring sending rakhi with post nashik news)

त्यात मात्र कुठेही भावनिक आधार दिसत नाही. यामुळे स्पीडपोस्ट, पार्सल सेवेस प्राधान्य दिले जाते. बहिण स्वतः आवडीची राखी खरेदी करून पोस्टाने पाठवते. भावाच्या हातात ज्या वेळी राखी पडते, त्या वेळी बहिणीच्या भावनिक संवेदना भावास जाणवतात. त्याच्याकडून बहिणीप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

दूरवरच्या भावाची कृतज्ञता बहिणीसाठी सर्वात मोठी भेटवस्तू असते. त्यातून नाते अधिकच घट्ट होत असते. त्यासाठी माध्यम ठरते टपाल विभागाची सेवा. टपाल विभागही त्यांचे कर्तव्य मोठ्या आत्मीयतेने पार पाडतात. यंदाही टपाल विभागाने त्यांची परंपरा कायम ठेवली आहे. वेळेवर भावास राखी मिळण्यासाठी राखीच्या पार्सलसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

दैनंदिन टपाल पाठविण्यात येणाऱ्या टपालात राखी टपालला अधिक प्राधान्य दिले जात आहे. एकाच ठिकाणचे अधिक राखी पार्सल असतील तर त्यासाठी स्वतंत्र बॅग ठेवली आहे. आजच्या दिवशीचे राखी पार्सल आजच संबंधित ठिकाणी रवाना केले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crowd at post office counter for Rakhi parcels
Rakshabandhan : यंदाच्या रक्षाबंधनाला स्वत: तयार करा या ५ राख्या

सुटीच्या दिवशी वाटप

रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीची राखी भावास मिळावी, यासाठी सुटीच्या दिवशी राखी पार्सलचे संबंधितांना वाटप केले जात आहे. ३० ऑगस्टला रक्षाबंधन होणार आहे. त्या आठवड्यात येणारी प्रत्येक सार्वजनिक सुटी तसेच रविवारीदेखील पार्सलचे वाटप सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे राखी पार्सल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कार्यालयात अतिरिक्त काउंटर उघडण्यात आले आहे.

विशेष राखी पाकीट

राखी पाठविण्यासाठी टपाल विभागाकडून दोन रंगात राखीचे छायाचित्र असलेले आकर्षक पाकीट विक्रीस उपलब्ध करून दिले आहे. प्रतिदहा रुपये पाकिटांचे दर आहेत. महिलांकडून पाकीट खरेदीस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दैनंदिन १ हजार पाकीट विक्री होत आहे.

"वेळेवर संबंधितास राखी पोच व्हावी, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. राखी विशेष पाकिटास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे." - रामसिंग परदेशी , वरिष्ठ पोस्टमास्तर, जीपीओ

Crowd at post office counter for Rakhi parcels
Rakshabandhan 2022: गुळ-नारळाच्या पुर्‍या कशा तयार करायच्या?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com