नाशिक: रामतीर्थावर धार्मिक विधी करणाऱ्या गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातील अंतर्गत वाद लवकरच मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सात जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दोन बैठकांमध्ये समितीने दोन्ही बाजूंच्या पुरोहितांचे म्हणणे ऐकून घेतले. बाहेरगावी गेलेले काही सदस्य परत आल्यावर या वादावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.