
Ramzan Festival | मालेगावला रोज दीड लाख नग नानची विक्री
मालेगाव (जि. नाशिक) : मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वात (Ramzan) येथील बाजारपेठांना झळाळी मिळाली आहे. फळ बाजाराबरोबरच तळलेले खाद्यपदार्थ, लस्सी, सरबत आदींना मागणी वाढली आहे. रमजान पर्वात नानचे (Naan) (भाकरीच्या आकाराचा पाव) मुस्लिमांबरोबरच हिंदू बांधवांमध्येही आकर्षण आहे. त्यामुळे रमजान, नान व मालेगावकर यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे. येथे दररोज दीड लाख नग नानची विक्री होते. नानला हिंदू-मुस्लिम बांधवांकडून पसंती मिळत आहे. शहरात २५ पेक्षा अधिक बेकरींमधून नानचे उत्पादन घेतले जाते.
शहरातील बेकरींमधून नानचे उत्पादन फक्त रमजान महिन्यातच घेतले जाते. वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू असल्याने मालेगावकर नानच्या प्रेमात पडले आहेत. २० ते ५० रुपये नगाप्रमाणे नान विकला जातो. येथे १९६५ पासून नान तयार केला जातो. रमजान महिन्यात तयार होणाऱ्या नानला हिंदू- मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. कोरोनामुळे दोन वर्षांपासून नान विक्री व्यवसायला झळ बसली होती. नान तयार करण्यासाठी लागणाऱ्या मैदा, तूप यांचे भाव गगनाला भिडले आहेत. तरीही येथे नान २० ते ५० रुपये नगाप्रमाणे विक्री होते. व्यवसायिकांनी नानचे वजन कमी करून, नान आहे त्याच किमतीत विक्री करण्याच्या फंडा अवलंबला आहे.
हेही वाचा: Hot Food Side Effects: खूप गरम जेवण खाताय? होऊ शकते नुकसान
नानमध्ये पराठा, काजू नानला मोठ्या प्रमाणात मागणी असते. येथे दररोज सायंकाळी सातपासून ते पहाटे पाचपर्यंत नान विक्रीचे दुकाने थाटलेली असतात. शहरातून कळवण, सटाणा, देवळा, नांदगाव, येवला, चांदवड, औरंगाबाद, सिल्लोड, धुळे यासह जवळच्या ग्रामीण भागात नान विक्रीला जातो. चहा व दूधात भिजवून नान खाल्ला जातो. उपवास काळात दिवसभर मोठा आधार या हेतूने नानकडे बघितले जाते.
हेही वाचा: Summer Food Tips : उन्हाळ्यात अन्न खराब होतेय! अशी घ्या काळजी
रमजानमध्ये असा करतात नानच्या वापर
नानला प्रौढ, महिलांसह लहान मुलांकडून पसंती दिली जाते. नानला उपवास ठेवण्याच्या वेळेला (सहेरीला) दूध, तुररी, चहा यासोबत खातात. सध्या शहरात अनेक चौकात नान विक्रीची हजारो दुकाने लागली आहेत. रमजान महिन्यात तयार होणाऱ्या नानने टोस्ट, पाव, खारी हा माल कमी प्रमाणात विक्री होतो. बेकरी व विक्रीतून शहरात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिक हा व्यवसाय करतात.
"गेल्या वर्षीच्या तुलनेत नान विक्री समाधानकारक आहे. नानसाठी लागणाऱ्या कच्च्या वस्तूंचे भाव वाढले आहेत. तरीही कमी किमतीत नान विक्री करावा लागत असल्याने वजन थोडे कमी करण्यात आले आहे."
-हबीब शेख हारून, बेकरी चालक, मालेगाव
नानचे प्रकार व दर (प्रति नग)
पराठा नान : ५०
काजू नान : ४०
फ्रूट नान : ३०
मिल्क मेड : ६०
माल पवा नान : ७०
Web Title: Ramzan Festival One And A Half Lakh Sale Of Naans Daily In Malegaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..