Ranji Trophy
sakal
नाशिक: रणजी क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील दोन क्रिकेट सामने नाशिकला खेळविले जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्रचा सामना १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान, तर महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटकचा सामना ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान खेळविला जाणार आहे. याशिवाय सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील सामनादेखील नाशिकला होणार आहे.