
Raosaheb Kasbe : भारताला हिंदूराष्ट्र करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असताना मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला आहे. हिंदूराष्ट्र निर्मितीचे कार्य असेच चालू राहिले तर देशात ठिकठिकाणी हिंसाचाराचे आगडोंब उसळतील आणि भविष्यात देशाचे तुकडे पडतील.
त्यामुळे भारत कधीच हिंदूराष्ट्र होऊ शकत नाही, असे परखड मत व्यक्त करत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्रनिर्मितीचे आवाहन केले. (Raosaheb Kasabe statement India can never become Hindu nation nashik)
विचार जागर फाउंडेशनतर्फे बुधवार (ता. १२) मु. श. औरंगाबादकर सभागृहात आयोजित ‘मणिपूरमधील धगीचा अर्थ काय’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, साहित्यिक निरंजन टकले व मणिपूरचा विद्यार्थी सोमराई पानमई उपस्थित होते.
या वेळी कसबे म्हणाले, हिंदूराष्ट्र निर्मितीला हिंदू धर्मातील खालच्या जातींचा विरोध आहे. हिंदूराष्ट्राला विरोध करणाऱ्यांचा सफाया करण्याची ही प्रक्रिया सुरू असून, भविष्यात अल्पसंख्याक समाजासह ओबीसींचा यात समावेश होईल.
भाजपने आपल्या विचारांमध्ये बदल केल्याशिवाय मणिपूरचा प्रश्न सुटणार नाही. सर्वधर्मसमभाव जोपासण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण व्हायला हवे. प्रत्येकाने आपला धर्म घरात जोपासावा, समाजात नाही.
त्यातूनच समृद्ध भारत घडेल आणि विविध जाती-धर्माचे लोक एकत्र राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हिंदूराष्ट्र निर्माण करण्यापूर्वी देशातील अल्पसंख्याक समाजाची व्यवस्था लावावी लागेल.
राजकीय सत्तेचा मार्ग हा दंगलीतून आणि विकासाचा मार्ग विचाराधीन प्रवाहातून जातो. विकास किती झाला याचे मोजमाप कुणीच केलेले नाही. त्यामुळे कुठलाही दंगलीत जाती, धर्माचा नव्हे, तर माणूस मरतो.
तुम्ही करूणेने भरलेले मन धरून उभे राहिले तरच माणुसकी टिकून राहील, असा विश्वास उत्तम कांबळे यांनी व्यक्त केला. मणिपूरमधील दंगल थांबविण्यात भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकार अपयशी झाल्याने येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे आवाहन सुरेश भटेवरा यांनी केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांनी या राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना दंगलीची ठिणगी पडली तेव्हापासूनचा प्रवास सांगितला. मैथेय समाजाने अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली.
त्याला विरोध करताना कुकी समाजाने ३ मे २०२३ मध्ये मोठी रॅली काढली आणि येथूनच दंगल सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पंतप्रधान मोदी बोलतच नसल्याची टीकाही त्यांनी केली. राजकीय स्वार्थापोटी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जात नसल्याचे निरंजन टकले यांनी सांगितले.
देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या तरच येथील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार गंभीरपणे पावले उचलतील अन्यथा मुख्यमंत्र्यांना हटवून राजकीय स्वार्थ साधतील, असेही ते म्हणाले. या वेळी काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील, डॉ. डी. एल. कराड, तानाजी जायभावे, राजू देसले आदी उपस्थित होते.
हॉल गर्दीने फुल, शौचालय बंद
औरंगाबादकर सभागृह पूर्णत: भरलेले असताना या हॉलशेजारील शौचालय मात्र बंद ठेवण्यात आले होते. अनेक श्रोत्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आतमधील लाइट सुरू ठेवून बाहेरून कुलूप लावण्याचे काय कारण? विशेष म्हणजे सावाना पदाधिकाऱ्यांची बैठक या हॉलच्या शेजारीच सुरू असताना त्यांनी जाणीवपूर्वक तर हे केले नसावे, असाही विचार काही श्रोत्यांनी बोलून दाखविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.