Shasan Aplya Dari: पाण्यापावसात गर्दी जमविण्यासाठी टार्गेट! प्रतीक्षा लाभार्थी अन् गर्दीची

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dariesakal
Updated on

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे शासकीय पातळीवर जोरदार नियोजन सुरू आहे. एका बाजूला ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी गर्दी जमविण्यासाठी प्रशासकीय पातळीवरही नियोजन सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.

त्यामुळे पाण्यापावसात गावोगावचे लाभार्थी अन् गर्दी जमविण्यासाठी यंत्रणेने टार्गेट निश्चित केले आहे. (Shasan Aplya Dari Target to gather crowds in rain Waiting beneficiaries and crowds nashik)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

एकाचवेळी प्रमाणपत्रापासून तर विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांपर्यत सगळ्यांना एका छताखाली जमवून शासकीय योजनांना प्रतिसादाचे चित्र निर्माण करण्याच्या या उपक्रमात प्रत्येक विभागाला लाभार्थी आणि गर्दी जमविण्याचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे.

नाशिक जिल्ह्यात या उपक्रमात एका दिवशी साठ हजारांहून अधिक लाभार्थी जमा करण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर करण्यात आले आहे. दाखल्यांच्या वितरणापासून तर शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यापर्यंतच्या कामांना एका व्यासपीठाखाली वितरित करण्यात येणार आहे.

दाखले, रेशनकार्डापासून तर इतरही अनेक लाभ मिळण्यात एरव्ही कायम अडचणी येतात. सगळी प्रलंबित प्रकरण निकाली काढून या दिवसाच्या निमित्ताने लाभार्थ्यांची कामे करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’मुळे वाहतुकीला बसणार फटका; असे आहे वाहतूक मार्गातील बदल..

पावसात गर्दी

उपक्रमाला मुख्यमंत्री येणार असल्याने पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरावर बैठका घेऊन अधिकाधिक प्रकरण मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहावर त्यासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे.

डोम उभारणीसह विविध कामांना गती आली असताना दोन दिवसांपासून पावसाचा जोरही वाढला आहे. खरिपाच्या कामांची धामधूम सुरू असताना ग्रामीण भागातील शेतकरी आणायचे महत्त्वाचे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे.

प्रत्‍येक तालुक्यातून आलेल्या लाभार्थ्यांच्या येण्या-जाण्याची, भोजनाची सोय करणे अशी सगळी तयारी करताना यंत्रणेला लाभार्थ्यांना गावाकडे सुखरूप मार्गी लावण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.

रेशन दुकानदार

उपक्रमासाठी साठ हजारांहून अधिक लाभार्थी जिल्हाभरातून येणार असल्याने त्यांच्या भोजनाची सोय करण्याचे आव्हान आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची मदत घेण्यात आली आहे.

प्रत्येक दुकानदाराला किमान वीस ते तीस जणांचे आदरातिथ्य करण्याची सोय करावी लागणार आहे.

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : सुनीलची सलून व्यवसायातून उभारी..! जगण्यास मिळाले बळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com