Nashik Crime : लघूशंकेचा बहाणा करत पोलिसांच्या हाताला झटका देत अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयिताने धूम ठोकल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील विसे मळा भागात उघडकीस आला.
फरार झालेला संशयित दिंडोरी पोलिस ठाण्यात दाखल एका गंभीर गुन्ह्यातील संशयित आहे. उशिरापर्यंत फरारी संशयिताचा तपास सुरू होता. (Rape suspect escapes after slapping hands of police Nashik Crime)
मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनारे (ता. दिंडोरी) येथील संशयितास दिंडोरी पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयिताने त्र्यंबकेश्वर परिसरातील अंजनेरी परिसरात तरुणीवर बलात्कार केला होता.
याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली होती. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी दिंडोरी पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी त्यास गुरुवारी (ता. २८) त्र्यंबकेश्वर परिसरात नेले होते.
तेथून ते परतीच्या प्रवासाला शासकीय वाहनाने गंगापूर रोडवरील विसे मळा भागातून प्रवास करीत असताना संशयिताने लघूशंकेचा बहाणा केला. त्यानंतर एक पोलिस व संशयित रोडच्या दुसऱ्या बाजूला दुभाजक ओलांडून गेले.
ही संधी साधत संशयिताने पोलिसाच्या हाताला झटका देवून धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.