प्‍लाझ्मा संकलनात ‘ॲन्टीबॉडीज’ कडे सर्रास दुर्लक्ष; परिणामकारकतेवर प्रश्‍नचिन्‍ह

plazma
plazmaesakal

नाशिक : कोरोनाबाधितांवर उपचारासाठी (corona virus) प्‍लाझ्माचा (plazma) वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यातून रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची प्‍लाझ्मा मिळविताना दमछाक होतेय; परंतु वाढीव मागणीमुळे अनेक ठिकाणी प्‍लाझ्मा संकलनात ॲन्‍टिबॉडीजच्‍या (anti bodies) प्रमाणाकडे दुर्लक्ष होत असल्‍याचे चित्र आहे. त्‍यामुळे जरी ओढाताण करून मिळविल्‍यास अॅन्‍टिबॉडीजचे प्रमाण कमी असलेल्‍या प्‍लाझ्माच्‍या परिणामकारकतेवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित होत आहे. (Rare neglect of antibodies in plasma collection)

plazma
रेशीम उत्पादनातून मिळाले भरघोस उत्पन्न; 6 लाख ५० हजारांपेक्षा जास्त उत्पन्न

मागणी वाढल्‍याचा परिणाम; गुणवत्तेअभावी परिणामकारकता नाहीच

दुसऱ्या लाटेत आरोग्‍यव्‍यवस्‍था कोलमडलेली असताना ऑक्‍सिजन, इंजेक्‍शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता. अशात उपचाराचा पर्यायी भाग म्‍हणून प्‍लाझ्माला प्राधान्‍य दिले गेले. अद्यापही शहरासह जिल्‍हाभरात व राज्‍यातही बाधितांच्‍या उपचारासाठी प्‍लाझ्मा संकलन होते आहे; परंतु या प्रक्रियेत काही रक्‍तपेढ्यांकडून ॲन्‍टिबॉडीजच्‍या स्‍कोअरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत मागणीची पूर्तता करण्यास भर दिला जातो आहे. दुसरीकडे जादा पैसे मोजूनही विकत घेतलेले प्‍लाझ्मा रुग्‍णाला उपयोगी ठरतीलच का, याची शाश्‍वती नातेवाइकांना नसल्‍याने या प्रक्रियेबाबत सुसूत्रता आणण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होत आहे.

plazma
बिटको हॉस्पीटलची तोडफोड करण्याची वेळ पतीवर का आली? भाजपा नगरसेविका म्हणतात...

प्‍लाझ्मासाठी युवकांचे शर्थीचे प्रयत्‍न

गरजूंना मदतीसाठी अनेक युवक-युवती धावून येत आहेत. रक्‍तदात्‍याचा शोध घेण्यापासून रुग्‍णाच्‍या नातेवाइकांना प्‍लाझ्मा उपलब्‍ध करून देण्यापर्यंतची मेहनत या तरुणाईकडून घेतली जाते आहे. अनेक सेलिब्रिटीज‌नेदेखील पुढे येत पात्र व्‍यक्‍तींना प्‍लाझ्मादान करण्याचे अवाहन केले आहे.

प्‍लाझ्मा ही प्रायोगिक थेरपी असून, केवळ भारतातच या पद्धतीचा वापर होत असल्‍याने परिणामकारकता अभ्यासण्यात मर्यादा आहेत. प्‍लाझ्मा संकलनाकरिता किटच्‍या सामान्‍य रेंजच्‍या किमान दहापट ॲन्‍टिबॉडीज असल्‍यास ते रुग्‍णांसाठी प्रभावी ठरू शकते. याउलट अपेक्षित प्रमाणात ॲन्‍टिबॉडीज नसल्‍यास अशात प्‍लाझ्मा नकारात्‍मक परिणाम घडवू शकतो. -डॉ. प्रीतेश जुनागडे, प्रमुख, लोटस हॉस्‍पिटल

गेल्‍या काही दिवसांमध्ये प्‍लाझ्माच्‍या वाढत्‍या मागणीसोबत रक्‍तदात्‍यांचा शोध आम्‍ही घेत असतो; परंतु ॲन्‍टिबॉडीज दोनशेपेक्षा अधिक असल्‍यावरच संबंधितांना प्‍लाझ्मादानाचा सल्‍ला देते. कमी ॲन्‍टिबॉडीजचे प्‍लाझ्मा रुग्‍णांकरिता फारसे प्रभावी ठरत नाहीत. काही रुग्‍णांना एका पिशवीपेक्षा अधिक प्‍लाझ्माची गरज लागण्याचे हे प्रमुख कारण आहे. -सुचित्रा आहिरे, जिल्‍हाध्यक्ष, कुटुंब फाउंडेशन (सातारा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com