
त्र्यंबकेश्वरमध्ये आढळला दुर्मिळ विषारी विंचूच्या शेपटीचा कोळी
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा (Rain) जोर वाढताच, दुर्मिळ विषारी विंचूच्या शेपटीच्या कोळीचे दर्शन झाले. या कोळीला ‘ड्रॅग-टेलेड स्पायडर', ‘स्कॉर्पियन-टेलेड स्पायडर’ आणि स्कॉर्पियन स्पायडर’ म्हणून ओळखले जाते.
शेपटी मादीला असते. शेपटी एक ते तीन सेंटीमीटर लांब वाढू शकतात. दुसरीकडे शेपूट नसलेले नर दोन मिलिमीटर लांबीपर्यंत असतो. मादीपेक्षा ते खूप लहान असतात. हे ऑर्ब-विव्हर स्पायडरचे एक वंश आहे. ज्याचे वर्णन पहिल्यांदा ए. विन्सन यांनी १८६३ मध्ये केले होते. (Rare venomous scorpion tail spider found in Trimbakeshwar nashik Latest marathi news)
आफ्रिकेतील एका प्रजातीसह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये आढळतात. देशात ‘अर्चुनरा अंगुरा’ ही जात आढळते. प्राचीन ग्रीक शब्द ‘अराचने’ (कोळी) आणि ‘उरो’ (शेपटी) यांच्या संयोगाने ‘स्पायडर’ ला त्याचे नाव मिळाले.
हे कोळी विंचूशी संबंधित नाहीत. मादीची शेपूट विंचवा सारखी असल्याने त्याला पाहिल्यावर विंचू असल्याचा भास होतो. जेव्हा त्रास होतो, तेंव्हा ते त्यांच्या शेपटी कुरळे करतात, परंतु ते पूर्णपणे निरुपद्रवी असतात. हे कोळी नीम विषारी असून चावा घेतल्यावर वेदना आणि सूज अशी लक्षणे दिसून येतात.
ते रात्रं-दिवस त्यांच्या जाळ्याच्या मध्यभागी राहतात आणि त्यांचे शरीर झाडांच्या कचरा, जसे की गळून पडलेली फुले, डहाळे अथवा मृत पाने यांचे अनुकरण करतात. कोळ्याच्या १२ प्रजाती आहेत.
हेही वाचा: ‘PCM’ चे प्रवेशपत्र झाले उपलब्ध MHT-CET परीक्षेचे 5 ऑगस्टपासून आयोजन
जंगलात हे कोळी शिकारींनी खाऊ नये म्हणून अनेकदा मृत पाने असल्याचे भासवतात. हे कोळी जंगले, बागा आणि गवताळ प्रदेशात आढळतात. या कोळ्यांचे जाळे सहसा जमिनीच्या पातळीजवळ असतात.
हे जाळे एकतर उभ्या दिशेने क्षितिज अभिमुखतेमध्ये अथवा कोनात कातलेले असतात. मादी ५० ते ६० अंडी एका लहान पिशवीत जमा करतात. आठ पिशव्या संपूर्ण जाळ्यावर वितरित केल्या जातात.
अंडी वाहून नेणारी पिशवी अंडाकृती आकाराची, लोकरीची पोत आणि तपकिरी रंगाची असते. आतील लहान अंडी ‘क्रीम’ रंगाची असतात. हे कोळी लहान कीटकांवर उदरनिर्वाह करतात. कीटक रेशमी जाळ्यात अडकतात आणि नंतर कोळी त्यांना खातात.
हेही वाचा: ‘मासिक पाळी’मुळे वृक्षारोपणापासून विद्यार्थिनीस रोखले
Web Title: Rare Venomous Scorpion Tail Spider Found In Trimbakeshwar Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..