sugar factory.png
sugar factory.png

रासाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला सुरूवात

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या केद्रस्थानी राहीलेल्या रासाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने 15 वर्षीसाठी भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे.सक्षम सहकारी संस्थाना भाडेतत्वावर साखर कारखाने भाडेतत्‍वावर घेता येतील असा बदल राज्य शासनाने कायद्यात केल्याने आमदार दिलीप बनकर यांची एकहाती सत्ता असलेल्या पिंपळगांव बाजार समिती,स्व.अशोक बनकर पतससंस्था,भिमाशंकर ॲग्रो प्रॉडक्यस या संस्था निविदा भरण्याची शक्यता आहे.

रासाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा
गेली आठ वर्षापासुन निफाड साखर कारखाना स्वाहाकारामुळे 350 कोटी रूपयांच्या कर्जात बुडाला. तर रानवड कारखान्याची अग्नीप्रदिपन वर्षापासुन होऊ शकले नाही. निसाकानंतर ऊसउत्पादकाचा आधारवड ठरलेला रानवड मुंडे यांच्या वैद्यानाथ,बागडे यांच्या छत्रपती संभाजी,आदी संस्थानी चालविण्याचा प्रयत्न केला.पण करार अर्ध्यावर सोडुन व शेतकऱ्याची एकुण 24 कोटी रूपयांची देणी थकवत त्यांनी धुम ठोकली.रानवड भाडेतत्वावर सुरू करता येणे शक्य असुनही शासनाकडुन दिरंगाई होत असल्याने निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.


हंगामाच्या शेवटी पेटणार रानवडचे धुराडे....
सव्वा वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार बनकर यांनी निवडुन द्या..साखर कारखाने सुरू करून दाखवतो असे आश्‍वासन दिले होते.निवडणुक होऊन वर्ष उलटले तरी शासनस्तरावरून सकारात्मक हालचाली होत नव्हत्या.आमदार बनकर यांंना विरोधक आश्‍वासनाची आठवण करून देत टिकास्त्र सोडत होते.त्यातच उपमुख्यमंत्री पवार यांनी साखर संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रासाका सुरू होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती.

ऊसतोडणीचा हंगाम निम्म्याच्या पुढे

आमदार बनकर यांनी सहकार मंत्र्याशी बैठका घेऊन व सहकारी संस्थानां साखर कारखाने भाडेतत्वावर घेता येण्याचे कायद्यात रूपांतर करून घेतले. टिकेला उत्तर न देता दोन महिने उशीरा का होईना निविदा प्रक्रिया राबवत एका आश्‍वासन पुर्तीकडे पाऊल टाकले. ऊसतोडणीचा हंगाम निम्म्याच्या पुढे सरकला आहे.दोन हजार एकरावर सध्या ऊस शिल्लक आहे.11 जानेवारी 2020 ला निविदा उघडुन रासाका कोणत्या संस्थेला द्यायचा याबाबत निर्णय होईल.आमदार बनकर यांच्या ताब्यातील तीनही संस्था निविदा भरणार यात शंका नाही.ते स्वत: सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने रासाकाची सुत्रे पुढील पंधरा वर्षासाठी बनकर यांच्या ताब्यात आली तर आश्‍चर्य वाटायला नको.

प्रतीदिन अवघी १२५० मेट्रिक टन ऊस गाळपाची क्षमता असलेल्या रासाका चालविण्यास घेणे म्हणजे विषाची परिक्षा आहे. वैद्यनाथ व छत्रपती संभाजीराजे या दोन बड्या साखर कारखान्यांनी रासाका चालविताना गुडघे टेकले.त्यातच यंदा चा हंगाम शेवटी मिळणार आहे. ऊसाचे क्षेत्र, तोडणी कामगार, वाहतूक, यंत्र सामुग्री दुरुस्ती अशी आव्हाने आहेत.
हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

कोरोनाचे संकट ओढावल्याने निविदा प्रक्रियेला सहा महिने दिरंगाई झाली याची खंत वाटते. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, यांच्या सहकार्याने रासाका लवकरच सुरू होईल.रासाका सुरू झाल्यानंतर निसाका सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. टिकेला उत्तर न देता किंवा श्रेय वादात न अडकता शब्दपुर्तीला प्राधान्य देणार आहे.-आमदार दिलीप बनकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com