रेशन दुकानातून आता चहा-कॉफीचीही विक्री | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ration shop

रेशन दुकानातून आता चहा-कॉफीचीही विक्री

नाशिक : राज्यातील रेशन दुकानांतून आता खुल्या बाजारातील अंघोळ व धुण्याचा साबण, हँडवॉश, डिटर्जंट पावडर, शाम्पू, चहा-कॉफी विकता येईल. त्यास अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बुधवारी (ता. १७) मान्यता दिली. ही परवानगी अस्थायी स्वरुपाची असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात होणाऱ्या बदलात त्याचा समावेश होण्याची शक्यता विभागाने स्पष्ट केली आहे.

दुकानापर्यंत खुल्या बाजारातील वस्तू मिळवणे, विक्रीपोटीचे कमीशन यासाठी रेशन दुकानदारांनी वितरकांशी परस्पर संपर्क साधायचा आहे. व्यवहार संबंधित कंपनी, त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रेशन दुकानदारांमध्ये असतील. त्यात सरकारच्या कसल्याही प्रकारचा सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही, असे विभागाने मान्यता आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, खुल्या बाजारातील वस्तूंची यापूर्वी रेशन दुकानातून विक्री करण्यास परवानगी देण्यात होती. त्यात आता या वस्तूंची वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिक : जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑफलाइन अर्जही स्विकारणार

हेही वाचा: नाशिक : कर्मचाऱ्यांच्या वेतनात ठेकेदारांची पाकीटमारी

loading image
go to top