Ready-To-Wear Sarees : दिवाळीसाठी साड्यांची मोठी मागणी! 'रेडी टू वेअर' साड्यांनी केली तरुणींची सोय
Ready-to-Wear Sarees Gain Popularity Among Young Women : साडी खरेदी केल्यानंतर पिको–फॉल, ब्लाऊज मॅचिंग, शिवणकाम अशा तयारीस बराच वेळ जातो. त्यामुळे साडी नेसणे तरुणींना वेळखाऊ आणि अवघड वाटते. अशा महिलांसाठी पर्याय ठरत आहेत ‘रेडी टू वेअर’ साड्या, ज्यांना सध्या सर्वाधिक मागणी आहे.
नाशिक: दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत सजावटीच्या वस्तूंबरोबरच कपड्यांचीही खरेदी जोमात सुरू आहे. सणासुदीच्या काळात पारंपरिक पेहराव म्हणून साडीला महिलांचे प्राधान्य कायम आहे.