कोरोना काळातही देशातील कांद्याने खाल्ला ‘भाव’; मिळाले २०९१ कोटींचे परकीय चलन

onion-2-6410.jpg
onion-2-6410.jpg

लासलगाव (नाशिक) : गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देश-विदेशात लॉकडाउन असतानाही देशातून एप्रिल ते १४ सप्टेंबरपर्यंत कांद्याची १३ लाख सहा हजार ०२२.१३ टन इतकी निर्यात झाली. त्यातून केंद्र सरकारला २०९१ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. साडेपाच महिन्यांच्या निर्यातबंदीनंतरही तीन महिन्यांचा कालावधी या आर्थिक वर्षात बाकी असून, पुन्हा निर्यात खुली झाल्याने २०१८-१९ च्या आर्थिक वर्षाच्या निर्यातीची आकडेवारी पार करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

साडेपाच महिन्यांत मिळाले २०९१ कोटींचे परकीय चलन 

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही कांदा निर्यातीत भरघोस वाढ झाली आहे. गेल्या उन्हाळ कांद्याच्या हंगामात १३० टक्के इतके बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा देश-विदेशात होत असल्याने कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले होते. त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने निर्यातीला प्रोत्साहन दिल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते १४ सप्टेंबरपर्यंत १३ लाख सहा हजार ०२२.१३ टन इतकी कांदा निर्यात झाली होती. त्यातून दोन लाख नऊ हजार १००.८९ लाख रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. तर २०१९-२० या गेल्या आर्थिक वर्षात ११ लाख ४९ हजार ८९६.८४ इतकी निर्यात झाली होती. त्यातून दोन लाख ३२ हजार ०६९.६३ लाख रुपये परकीय चलन मिळाले होते. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात २१ लाख ८३ हजार ७६६.४२ टन कांदा निर्यात झाली आहे. त्यातून तीन लाख ४६ हजार ८८७.३८ लाख रुपये इतके परकीय चलन कांदा निर्यातीतून केंद्र सरकारला मिळाले आहे. 

यंदा लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्रातील निर्यात ४३.३ टक्क्यांनी वाढ झाल्याने केंद्र सरकारला परकीय चलन मिळण्यास मोठी मदत झाली आहे. यामुळे केंद्र सरकारने आयात-निर्यात धोरणात बदल करताना या गोष्टींचाही विचार केला पाहिजे, असे मत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. -नानासाहेब पाटील (संचालक, नाफेड, नवी दिल्ली) 

देशाची एकूण निर्यात आकडेवारी 

२०१८-१९ - २१ लाख ८४ हजार टन - ३४६९ करोड 
२०१९-२० - ११ लाख ५० हजार टन - २३२१ करोड 
२०२०-२१ - १३ लाख ०६ हजार टन - २०९१ करोड (एप्रिल ते १४ सप्टेंबरपर्यंत). 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com