esakal | नाशिक शहर बससेवेचा नवा विक्रम! एकाच दिवसात ६ लाखांवर उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik City bus service

नाशिक शहर बससेवेचा नवा विक्रम! एकाच दिवसात ६ लाखांवर उत्पन्न

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या शहर बससेवेला (Nashik city bus) एक महिना पुर्ण झाल्यानंतर तीस दिवसात तब्बल तीन लाख प्रवाशांनी प्रवास करताना ६५ लाख रुपयांचा महसुल प्राप्त सिटीलिंक कंपनीच्या तिजोरीत जमा झाल्यानंतर मंगळवारी (ता. ५) एकाचं दिवसात २९ हजार ४६० प्रवाशांनी बससेवेतून प्रवास केला. विक्री झालेल्या तिकीटातून तब्बल सहा लाख ३० हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले तर एकाचं दिवशी १२१८ फेऱ्यांची नोंद एकाच दिवशी झाल्याने सिटीलिंक सेवेसाठी मंगळवारचा दिवस विक्रमी ठरला.


महापालिकेच्या वतीने आठ जुलै पासून शहर बससेवा सुरु झाली. पहिल्या टप्प्यात तपोवन ते बारदान फाटा, तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज, तपोवन ते पाथर्डी गाव, सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड, तपोवन ते भगूर, नाशिक रोड ते बारदान फाटा, नाशिक रोड ते अंबड गाव, नाशिक रोड ते निमाणी, नाशिक रोड ते तपोवन या नऊ मार्गांवर मार्गांवर २७ बसेस सुरू करण्यात आल्या. त्यानंतर नाशिकरोड ते सिम्बॉयसिस कॉलेज, तपोवन ते अंबड, तपोवन ते पाथर्डी, तपोवन ते अंबड (कामटवाडे मार्ग) या नवीन चार मार्गांची भर पडली. मार्गिका वाढल्याने २३ बसेस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी तीन हजार प्रवाशी मिळाले त्यातून एक लाख ६५ हजार रुपये उत्पन्न मिळाले. बससेवेला दिवसागणिक प्रतिसाद मिळतं आहे. प्रवासी संख्या वाढतं असल्याने बसेसची संख्या वाढविली जात आहे. शहरात सध्या ५२ बसेस सुरू आहेत. सिटी लिंक कंपनीच्या वतीने महिना भराचा आढावा घेतला असता तीन लाख प्रवाशी टप्पा ओलांडल्याचे स्पष्ट झाले. घटस्थापनेपासून आणखी ४४ नवीन बसेस ताफ्यात दाखल होत आहे.

हेही वाचा: नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे टोलनाका होणार बंद? गडकरी सकारात्मक


प्रवाशांबरोबर उत्पन्नात वाढ

कोरोना मुळे निर्बंध आहेत, त्यामुळे पुरेशा प्रमाणात बसेस रस्तयावर धावतं नाही. सध्या ५२ बसेस असून, ८ ते १८ जुलै या कालावधीत २७, तर १९ जुलैपासून २५ बसेस दाखल झाल्या आहेत. महिना भरात दोन लाख ६२ हजार ३६१ किलोमीटर बसेस धावल्या. दोन लाख ८३ हजार २७२ प्रवाशी बसला मिळाले. मंगळवारी सर्वाधिक २९,४६० प्रवाशांनी बस मधून प्रवास केला. सहा लाख ३० हजार ८३५ रुपये उत्पन्न एकाचं दिवशी मिळाल्याचे व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले.

ग्रामिण सेवेला एस.टी. कामगार सेनेचा विरोध

सिटिलिंक कंपनीकडून सिन्नर, ओझर बससेवा सुरु झाल्यानंतर स्थानिक नागरिकांची सोय झाली असली तरी एस.टी. कामगार सेनेने जिल्हाधिकायांना भेटून विरोध केला आहे. ग्रामीण भागात महापालिकेच्या बससेवेला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. महापालिकेच्या वतीने पाच टप्प्यात ही बससेवा चालविली जाणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सेवेचा तिसरा टप्पा सुरु होत असून एकुण १२५ बसेस धावणार आहे. सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, गिरणारे, कवडधरा, वाडीवऱ्हे या ग्रामीण भागापर्यंत बससेवा सुरू केली जाणार असून सोमवार पासून सिन्नर बससेवा सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या बससेवेमुळे राज्य परिवहन महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या बससेवेवर परिणाम होणार असल्याने विरोध करण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळ तोट्यात आहे. महापालिकेच्या नवीन सेवेमुळे एसटीवर गदा येण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. एस.टी. कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष शाम इंगळे, कार्याध्यक्ष राजेश ब्राम्हणकर, सचिव देविदास सांगळे, यांनी निवेदन दिले आहे.

हेही वाचा: नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणणार; नितीन गडकरींचे आश्वासन

loading image
go to top