Lasalgaon soybean market
sakal
लासलगाव: या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक नोंदविण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे दिवाळीपूर्वी कमी प्रमाणात येणारी आवक यंदा मात्र मोठ्या प्रमाणात झाली असून, सरासरी भाव चार हजार ३०० रुपये आणि कमाल भाव पाच हजार १०० रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला. मात्र, समाधानकारक भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.