Recruitment : नोव्हेंबर महिन्यात वैद्यकीय, अग्निशमन विभागात भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

recruitment

Recruitment : नोव्हेंबर महिन्यात वैद्यकीय, अग्निशमन विभागात भरती

नाशिक : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या क्षेत्राबाहेरील पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याच अनुषंगाने महापालिकेनेदेखील अग्निशमन व वैद्यकीय विभागातील २४८ पदांच्या भरतीचा निर्णय घेतला असून, ‘टीसीएस’ किंवा ’आयबीपीएस’ मार्फत भरती केली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भरती होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Recruitment in Medical Fire Department in month of November Nashik News)

हेही वाचा: Nashik Accident Update : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार

कोविड काळामध्ये वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्यात महापालिकांमध्ये महत्त्वाची पदे तातडीने भरण्याचा निर्णय दिला. तातडीची बाब म्हणून मानधनावर पदे भरण्यास मान्यता दिली. कोरोनानंतरदेखील राज्य शासनाने महत्त्वाचे म्हणजेच अग्निशमन व वैद्यकीय विभागात रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्याचा निर्णय जाहीर केला. नाशिक महापालिकेत वैद्यकीय विभागात ८१ डॉक्टरांसह अग्निशमन विभागातील २४८ पदे रिक्त आहेत.

परंतु, सेवा- शर्ती नियमामुळे ती पदे भरता येत नाही. शासनाने सेवा- शर्ती नियमावलीचा तांत्रिक मुद्दा निकाली काढताना महापालिकेकडून तातडीने प्रस्तावदेखील मागविला. त्यानंतर रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्षेत्र बाहेरील राजपत्रित गट ‘ब’ तसेच गट ‘क’ संवर्गातील पदांकरिता टीसीएस किंवा आयबीपीएसमार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच अनुषंगाने नाशिक महापालिकेमार्फतदेखील नोव्हेंबर महिन्यात भरती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: Bhaubeej Special Nashik : माहेरवाशिणींना पाण्यातील मंदिराचे दर्शन