PM Crop Insurance Scheme: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत नोंदणी करावी

PM Crop Insurance Scheme
PM Crop Insurance Schemeesakal

PM Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (सर्वसमावेशक पीक विमा) यंदापासून शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून आपल्या पिकांना विमा कवच मिळणार आहे.

यामुळे अधिकाधिक शेतकरी विमा योजनेत सहभागी होऊ शकतील तसेच, नव्याने भात, कापूस, सोयाबीन पिकामध्ये मंडळ मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना सेसीग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

जिल्ह्यातील १३ पिकांना विमा संरक्षण मिळणार असून ३१ जुलैपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (Register in Pradhan Mantri Crop Insurance Scheme by 31st July nashik)

विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे.

त्या अनुषंगाने खरिपासाठी १ रुपयांत सहभागी होता येणार आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी कंपनीच्या १८००१ १८४८५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

PM Crop Insurance Scheme
Haj Yatra: 20 वर्षापासूनच्या निश्चयास अंतिम स्वरूप; दिंडोरी रोड येथील महम्मद अली सय्यद यांची पायी हज यात्रा

तसेच, पीक विमा भरण्यासाठी नजीकच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच, नजीकच्या आपले सरकार सेवाकेंद्र अथवा बँकेशी संपर्क साधावा.

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासंदर्भातील अटी व त्याबाबतच्या अधिक माहिती आपले सरकार केंद्र अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

PM Crop Insurance Scheme
NCP Sharad Pawar: आम्ही शरद पवार साहेबांबरोबरच...! नाशिक रोड येथील पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा निर्धार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com