JEE Advanced : जेईई ॲडवास्‍डसाठी 30 पासून नोंदणी; आता लक्ष मेन्‍सच्‍या निकालाकडे

JEE ADVANCE
JEE ADVANCEesakal

JEE Advanced : आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जेईई परीक्षा घेतली जाते आहे. दोन्‍ही सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षा पार पडलेली आहे.

आता निकालाकडे लक्ष लागून असून, पात्रताधारक विद्यार्थ्यांना जेईई ॲडवास्‍ड परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरु होईल. (Registration for JEE Advanced from 30 Now focus on mains result nashik news)

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी दोन सत्रांमध्ये जेईई मेन्‍स परीक्षा घेण्यात आले. जानेवारी सत्रातील परीक्षा झाल्‍यानंतर नुकतीच एप्रिल महिन्‍यात दुसऱ्या प्रयत्‍नातील जेईई मेन्‍स परीक्षा नुकतीच पार पडली आहे.

त्‍यानंतर आता निकालाकडे लक्ष लागून राहणार आहे. या निकालासोबत राष्ट्रीय क्रमवारीदेखील जाहीर होणार असून, त्‍याआधारे विद्यार्थ्यांची जेईई ॲडवास्‍ड परीक्षेसाठी पात्रता निश्‍चित होणार आहे.

व अंतिमतः जेईई ॲडवास्‍ड परीक्षेच्‍या आधारे आयआयटी व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दरम्‍यान २०२३ साठी जेईई ॲडवासड परीक्षेचे आयोजन इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी), गुवाहाटी यांच्‍यातर्फे केले जाते आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

JEE ADVANCE
Water Management : ओझर, जानोरी भागातील गावांमध्ये पाणी कपात; टंचाई भासू नये यासाठी नियोजन

४ जूनला होणार जेईई ॲडवास्‍ड

जेईई ॲडवास्‍ड परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरु होणार असून, ७ मेपर्यंत नोंदणीची मुदत असेल. यानंतर शुल्‍क भरण्यासाठी ८ मेपर्यंतचा कालावधी दिला जाईल. प्रवेशपत्र २९ मे ते ४ जून यादरम्‍यान उपलब्‍ध करून दिले जाणार आहे.

तर ४ जूनला सकाळी नऊपासून पेपर क्रमांक १ तर दुपारी अडीचपासून पेपर क्रमांक २ पार पडणार आहे. जूनच्‍या अंतिम आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येतील.

JEE ADVANCE
Ambadas Danve : अटी, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करा : अंबादास दानवे

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com