Nashik News : रानमळ्यात बहरला नवचैतन्यदायी पळसराज!

इगतपुरीचे सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यासाठी हौशी अभ्यासक लावताहेत हजेरी
A flowering palas tree in the taluka
A flowering palas tree in the talukaesakal

इगतपुरी (जि. नाशिक) : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. त्यामुळे येथे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले निसर्गसौंदर्य जागोजागी दृष्टीस पडते. या डोंगररांगेत वनस्पतिशास्त्र प्रेमींच्या दृष्टीने दुर्मिळ होत असलेल्या विधिध औषधी तसेच रानफुले सध्या बहरली आहेत.

या मनमोहक दृश्यामुळे इगतपुरी व कसारा घाटाचा परिसर दुर्मिळ वनौषधींनी जणू नटला आहे. रानमळ्यात पळस बहरल्यामुळे निसर्गात नव्या केशरी पालवीने चैतन्य निर्माण झाले आहे. या काळातील विविध रानफुले, वनस्पती व वनऔषधी झाडे झुडुपे बघण्यासाठी व सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे विविध भागातून अभ्यासक व हौशी पर्यटक हजेरी लावत आहेत. (Rejuvenating Palasa Raj bloomed in Ranmala at igatpuri Nashik News)

महिन्याभरापासून शिशिर ऋतूत वृक्षवेली झाडे वेलींनी जुनी पालवी टाकून दिल्याने निसर्गात पानझडीमुळे मरगळ आल्याचे चित्र होते, मात्र निसर्गानेच दुसऱ्या बाजूने माळरानात असलेले वृक्षराज पळस मात्र गर्द केशरी रंगाचा शालू नेसल्यागत बहरल्याने निसर्गात एक नवचैतन्य बहरलेले दिसून येत आहे.

फाल्गुन पौर्णिमेपासून वसंतोत्सवास प्रारंभ होतो. या काळात होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन हा उत्सव असतो. यावेळी पळसाचा गर्द केशरी फुलांचा रंग तयार करून धूलिवंदन खेळून एकमेकांत प्रेम वाटले जाते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

A flowering palas tree in the taluka
Pimpalgaon Market Committee : सत्तासंघर्षापूर्वी रंगली न्यायालयीन लढाई!

पळस : ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवण्याच्या पत्रावळीसाठी याच्या पानांचा वापर होतो. उत्तर भारतात या झाडास वसंत ऋतूत (होळीच्या सुमारास) गर्द केशरी रंगाची फुले येतात तर महाराष्ट्रात (फेब्रुवारी मार्चमध्ये) फुले येतात.

या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात, त्याचा औषधी उपयोग आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट (Flame of the forest) असे म्हणतात. त्याच्या बहराने रान जणू लालबुंद दिसते.

A flowering palas tree in the taluka
Nashik News : पिंपळगाव सोसायटीचे सर्व संचालक अपात्र; जिल्ह्यातील पहिलीच घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com