एलआयसीची विमा रक्कम देण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र नियमांमध्ये शिथिलता

‘एलआयसी’च्या सर्व कार्यालयांचे कामकाज आजपासून प्रत्येक आठवड्यात, सोमवार ते शुक्रवार, सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत सुरू राहील.
LIC
LICGoogle

नाशिक : कोरोना महामारीमध्ये (Coronavirus Epidemic) ग्राहकांच्यादृष्टीने भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी)(LIC) विमा दाव्याची रक्कम मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुलभ केली आहे. विमाधारकाचा मृत्यू रुग्णालयात झाल्यास वारसदारांना विम्याची रक्कम जलद देण्यासाठी महापालिकेच्या मृत्यू दाखल्याऐवजी विमाधारकाच्या मृत्यूचा पुरावा म्हणून इतर बाबी ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे. (Relaxation in death certificate rules for payment of LIC sum assured)


सरकारी अथवा कर्मचारी राज्य विमा योजना अथवा संरक्षण दलाच्या अथवा कॉर्पोरेट रुग्णालयाने दिलेल्या आणि मृत्यूची तारीख व वेळ स्पष्टपणे नमूद केलेले मृत्यू प्रमाणपत्र, डिस्चार्ज सारांश, मृत्यू माहितीचा सारांश, ज्यावर एलआयसीच्या सेवेत दहा वर्षे कार्यरत असणाऱ्या वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्याची अथवा विकास अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली असेल आणि त्यासोबत विमाधारकाचा अंत्यसंस्कार अथवा दफनविधी झाल्याची अथवा संबंधित अधिकाऱ्याने त्याच्या ओळखीबाबत जारी केलेली पावती जोडलेली असेल, ही बाब ग्राह्य धरली जाणार आहे. इतर प्रसंगांमध्ये मृत्यूदाव्याची रक्कम मिळण्यासाठी महापालिकेने दिलेले विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. याशिवाय आता ‘एलआयसी’च्या सर्व कार्यालयांचे कामकाज आजपासून प्रत्येक आठवड्यात, सोमवार ते शुक्रवार, सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत सुरू राहील. प्रत्येक शनिवारी ‘एलआयसी’ कार्यालयांना साप्ताहिक सुटी असेल.

LIC
मी ‘ईडी’ आयुक्त बोलतोय....‘ईडी’च्या नावाचा गैरफायदा घेत मागितली खंडणी!


हयातीच्या दाखल्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत सूट

मूळ रक्कम परत मिळण्याचा पर्याय निवडलेल्या निवृत्तिवेतन योजनेत सहभागी ग्राहकांना हयातीचा दाखला सादर करण्याच्या नियमात ३१ ऑक्टोबरपर्यंत सूट देण्यात आली आहे. इतर प्रकरणांमध्ये ई-मेलद्वारे पाठविलेले प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार आहे. हयातीचा दाखला सादर करण्यासाठी ‘एलआयसी’ने व्हिडिओ कॉल पद्धतीचा वापर सुरू केला आहे. महामारी आणि निर्बंधाच्या सध्याच्या परिस्थितीत, दाव्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, जेथून विमा काढला त्याच शाखेत जमा करण्यात ग्राहकांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, देय असलेले परिपक्वता दावे अथवा ठराविक मुदतीनंतर मिळणाऱ्या लाभाच्या दाव्यांसाठी ग्राहकांना त्यांच्या जवळच्या शाखेत कागदपत्रे जमा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दाव्याची रक्कम जलद गतीने मिळण्यासाठी ग्राहकांच्या बॅंक खात्यात थेट रक्कम जमा होण्यासाठी आवश्यक बॅंक खात्याचे तपशील इत्यादीची नोंद ‘एलआयसी’ संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा सुरू केली आहे.


संपर्काविषयीची माहिती

विमा पॉलिसी विकत घेणे, विमा हप्त्याचा भरणा करणे, कर्जासाठी अर्ज करणे, कर्ज आणि त्यावरील व्याज फेडण्यासाठी पैशांचा भरणा करणे, विमा पॉलिसी घेताना अर्जात भरलेल्या पत्त्यात नंतर बदल करणे, एनएफटी विनंती नोंदणी करणे, पॅनकार्ड क्रमांकाचे तपशील अद्ययावत करणे इत्यादी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी विमा ग्राहकांना www.licindia.in. या संकेतस्थळाला भेट देता येईल. अधिक माहितीसाठीचा संपर्क असा ः कार्यकारी संचालक, भारतीय आयुर्विमा महामंडळ, केंद्रीय कार्यालय, मुंबई. ईमेल : ed_cc@licindia.com


(Relaxation in death certificate rules for payment of LIC sum assured)

LIC
नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com