
निवडणुकीसाठी 26 जुलैला नव्याने आरक्षण सोडत
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसाठी आरक्षण कायम ठेवल्याने महापालिका निवडणुकीसाठी २६ जुलैला नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
२९ जुलैला रोजी ओबीसी व सर्वसाधारण वर्गात महिला गटासाठी सोडत निघेल. त्यानंतर अंतिम आरक्षण ५ ऑगस्टपर्यंत प्रसिद्ध केले जाणार आहे. (Releasing reservation on July 26 for NMC elections Nashik Latest NMC Election Newsc)
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण कायम केले आहेत. त्यामुळे यापूर्वी राबविण्यात आलेली अनुसूचित जाती व जमातीची आरक्षण वगळता न्यायालयाने निश्चित केलेल्या ओबीसींच्या आरक्षित जागांवर सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे.
यापूर्वी ३१ मे २०२२ रोजी अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या एकूण ४४ प्रभागांमध्ये १३३ जागा आहे. अनुसूचित जाती व जमाती वगळता उर्वरित १०४ सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागांमधून ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार ३६ जागांवर आरक्षण देण्यासाठी २६ जुलैला सोडत काढली जाणार आहे.
त्यानंतर २९ जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग या दोन्ही गटातील महिला आरक्षण सोडत काढली जाईल. त्यानंतर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी कालावधी असेल. ३० जुलैला प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण जाहीर केल्यानंतर २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे. पाच ऑगस्टला अंतिम आरक्षण जाहीर केले जाणार आहे.
हेही वाचा: अवैध मद्यसाठ्यासह ट्रक, 2 कार जप्त; 9 संशयितांना अटक
असा असेल सोडतीचा कार्यक्रम
२६ जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला करिता आरक्षित जागा निश्चित केल्या जातील. २९ जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निघेल.
३० जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत राहील. त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी प्राप्त हरकती व सूचनांची छाननी करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.
हेही वाचा: ‘Z Plus’ नाकारून एकनाथ शिंदेंना मारण्याचा विचार होता काय? : सुहास कांदें
Web Title: Releasing Reservation On July 26 For Nmc Elections Nashik Latest Nmc Election News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..