esakal | रिलायन्स, इंडियन ऑइल नाशिकमध्ये करणार दीड हजार कोटींची गुंतवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance and Indian Oil

रिलायन्स, इंडियन ऑइलची नाशिकमध्ये दीड हजार कोटींची गुंतवणूक

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : रिलायन्स आणि इंडियन ऑइल कंपनीने नाशिकमध्ये दीड हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. त्यातून साडेतीन हजार जणांना रोजगाराची संधी अपेक्षित असून, नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी ही आशादायक बाब आहे. (Reliance and Indian Oil Company to invest Rs 1,500 crore in Nashik)

उद्योगमंत्री सुभाष देसाई, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. एन. अलबगन, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत जागा वाटपासंबंधीची बैठक नुकतीच झाली. त्या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सोमवारी (ता. १९) येथे ही माहिती दिली.

ते म्हणाले, की तळेगाव-अक्राळे (ता. दिंडोरी) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रिलायन्ससाठी १६० एकर, तर इंडियन ऑइलसाठी ५० एकर जागा दिली जाणार आहे. त्यामुळे तळेगाव-अक्राळेच्या औद्योगिक वसाहतीला चालना मिळण्यास मदत होईल. महामंडळातर्फे इथल्या उरलेल्या भूखंडांविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. रिलायन्सतर्फे बाराशे कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, त्यातून तीन हजार रोजगारनिर्मिती होऊ शकेल. तसेच, इंडियन ऑइलतर्फे ३५० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यातून सातशे रोजगारनिर्मितीची शक्यता आहे. पुढील काळात दोन्ही कंपन्यांचे सामंजस्य करार होतील.

औद्योगिक उत्पादने

- रिलायन्स - ‘लाइफ सेव्हिंग’ औषधे, लस, प्लाझ्मा थेरपी
- इंडियन ऑइल - क्रायोजनिक सिलिंडर (ऑक्सिजनसह)

(Reliance and Indian Oil Company to invest Rs 1,500 crore in Nashik)

हेही वाचा: अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द

loading image