दिंडोरीमधून मिळणार जगाला संजीवनी! ‘रिलायन्स लाइफ सायन्स' तर्फे लवकरच लसनिर्मिती प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance-Life-Science

दिंडोरीमधून मिळणार संजीवनी! रिलायन्सचा लसनिर्मिती प्रकल्प

लखमापूर (जि.नाशिक) : भारतासह संपूर्ण जगावर कोरोना महामारीने (corona virus) थैमान घातले आहे. यावर लसीकरण प्रभावी ठरत असले तरी महाकाय लोकसंख्येपुढे देशातील लशींची संख्या कमी पडत आहे. यातच आता दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात १६१ एकर क्षेत्रावर रिलायन्स उद्योग समूहाच्या ‘रिलायन्स लाइफ सायन्स’ कंपनी लसनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. याद्वारे सुमारे दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, यातून तीन ते साडेतीन हजार लोकांना रोजगार यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. यामुळे दिंडोरी तालुका हा केवळ जिल्ह्याला नव्हे, तर संपूर्ण जगाला लस पुरवठा करेल. (Reliance-Life-Science-prepares-to-launch-vaccine-manufacturing-project-in-dindori)

यानिमित्ताने लोकांना रोजगार उपलब्ध होणार

या गुंतवणुकीबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. या वेळी उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, रिलायन्स लाइफ सायन्सचे प्रमुख के. व्ही. सुब्रह्मण्यम, सीईओ विनय रानडे, दिनेश साठे, रामा प्रसाद, ज्ञानेश्‍वर पाटील आदी उपस्थित होते. प्लाझ्मा प्रोटीन्स यांसह विविध औषधांच्या निर्मितीत रिलायन्स लाइफ सायन्स कंपनी काम करते. सध्या मुंबईमध्ये कंपनीचा मोठा प्रकल्प आहे. आगामी काळात दिंडोरीमधील तळेगाव- अक्राळे परिसरातील एमआयडीसीमध्ये रिलायन्स कंपनीला सुमारे १६१ एकर जागा देण्यात आली असून, कंपनी गुंतवणूक करणार आहे.

लवकरच याबाबतची माहिती समजणार

कंपनीने याआधीदेखील नाशिकमध्ये पाहणी केली असून, नाशिकचे वातावरण कंपनीसाठी अनुकूल असल्याचे बोलले जात असल्याची प्रतिक्रिया सीआयआयचे सुधीर मुतालिक यांनी दिली. तर कंपनी नाशिकमध्ये प्रकल्प स्थापन करण्यासाठी उत्सूक असून, लवकरच याबाबतची माहिती समजणार आहे.

रिलायन्स कंपनीकडून याबाबत चाचपणी सुरू आहे. अद्याप अंतिम स्वरूप आलेले नसले तरी सकारात्मक प्रतिसाद आहे. -नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

हेही वाचा: 'त्या’ 27 नगरसेवकांच्या अपात्रतेची फाइल विभागीय आयुक्तांकडे

हेही वाचा: नगरपालिकेच्या राजकारणात घडलं-बिघडलं! नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक

Web Title: Reliance Life Science Launch Vaccine Manufacturing Project In Dindori Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Reliance Company