मालेगावात कोरोनाबाधितांसह मृत्युचे प्रमाण घसरल्याने दिलासा

शहरात कोरोनाबाधित रुग्णांसह मृत्युचे प्रमाण घसरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
corona
coronaGoogle
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात कोरोनाबाधित रुग्णांसह मृत्युचे प्रमाण घसरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पुर्व भागात अत्यल्प रुग्ण असून गेल्या दोन आठवड्यात रमजानची खरेदी, चॉंदरात जोरात असतानाही रुग्णसंख्या कमी झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (Relief in Malegaon due to declining death toll with corona outbreak)

कोरोनाबाधित रुग्ण व मृत्युचे तांडव कमी झाले असले तरी शहरातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून प्रशासनाने त्या दिशेने जनजागृती व उपाययोजना सुरु केल्या आहेत. मेच्या पहिल्या दोन आठवड्यातील बडा कब्रस्तान व आयेशानगर कब्रस्तान येथील दफनविधी व कोरोनाबाधित मृत्युंची संख्याही कमीच आहे.

पुर्व भागात अत्यल्प रुग्ण

येथील बडा कब्रस्तानात 1 मे ते 16 मे दरम्यान 138 मृत्युंची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी (सन 2020) मे महिन्यात 341 दफनविधी पार पडले होते. 138 पैकी फक्त 8 ते 10 मृत्यु हे कोरोनाबाधितांचे असून अन्य नैसर्गिक व इतर कारणांमुळे मृत्यू झालेले आहेत. आयेशानगर कब्रस्तानात 1 ते 15 मे दरम्यान 38 दफनविधी पार पडले. यात एक कोरोनाबाधित, आठ लहान मुले व 29 ज्येष्ठांचा मृत्यु झाला. गेल्या वर्षी सन 2020 आयेशानगर कब्रस्तानात मे महिन्यात 178 दफनविधी पार पडले होते. गेल्या दोन वर्षांची तुलना पहाता मृत्यु कमी झाले आहेत. पुर्व भागातील कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.

corona
Tauktae : नाशिक जिल्हा यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा; आपत्तीकालीन स्थितीत 'हे' करा

डॉक्टरांच्या उपचारची चर्चा

शहरात गेल्या दोन आठवड्यात 50 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झालेली नाही. पुर्व भागातील नागरिकांमध्ये कोरोनाची भिती कमी झालेली आहे. कोरोनाची चाचणी न करताच लक्षणे जाणवताच विविध पॅथींचे उपचार रुग्ण करुन घेत आहेत. मोहल्ला क्लिनीक, फॅमिली डॉक्टर व पुर्व भागात कोरोनावर अवघ्या दहा ते पंधरा हजारात मोठ्या धाडसाने उपचार करणाऱ्या काही डाॅक्टरांमुळे पुर्व भागातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. पुर्व भागातील या डॉक्टरांच्या उपचारची मालेगाव पॅटर्न अशी चर्चा होवू लागली आहे. ग्रामीण भागासह नजीकच्या शहरातूनही पुर्व भागातील डॉक्टरांकडे उपचारासाठी रुग्ण येत आहेत. सोशल मिडीयावर पुर्व भागात कोरोनावर नाममात्र दरात उपचार करणाऱ्या डॉक्टरांची नावे, मोबाईल क्रमांक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. याशिवाय रमजान काळातील पौष्टिक खाणे, ड्रायफ्रुटस्‌चा वाढलेला वापर, बीफ व दुध विक्रीतील वाढ, कोरोनाची कमी झालेली भिती आदींचाही चांगला परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी (सन 2020) एप्रिलमध्ये बडा कब्रस्तानात 459 तर आयेशानगर कब्रस्तानात 133 दफनविधी पार पडले. यावेळी एप्रिल 2021 मध्ये बडा कब्रस्तानात 248 तर आयेशानगर कब्रस्तानात अवघे 84 दफनविधी पार पडले. शहरापाठोपाठ तालुक्यातीलही रुग्णसंख्या व मृत्युचे प्रमाण कमी हाेत आहे.

corona
‘सेवाग्राम एक्सप्रेस’ला १९ पासून नांदगावला थांबा नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com