नाशिक: स्वातंत्र्य दिन व वीकेंड यामुळे आलेल्या सलग सुट्यामुळे पर्यटनाला बहर आला आहे. विविध मार्गांनी जिल्हांतर्गत व राज्य आणि देशभरातून भाविकांनी धार्मिक पर्यटनस्थळांना हजेरी लावली. रविवारी (ता. १७) सुटीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर परिसरात एक लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती होती. तर तीन दिवसांत सप्तशृंगगडावर सुमारे दीड लाखाहून अधिक भाविकांनी आदिशक्तीचे दर्शन घेतले. काळाराम मंदिरातदेखील रविवारी दिवसभर भाविकांची वर्दळ होती.