esakal | सर्वच तालुक्यांत गरजूंना रेमडेसिव्हिरचे वितरण व्हावे - भुजबळ

बोलून बातमी शोधा

bhujbal

सर्वच तालुक्यांत गरजूंना रेमडेसिव्हिरचे वितरण व्हावे - भुजबळ

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांमधील ऑक्सिजन टॅंकची नियमित देखभाल दुरुस्तीची व्यवस्था करावी. राज्याकडून जिल्ह्याला रेमडेसिव्हिर इंजेक्शन टप्प्याटप्प्याने मिळणार असून, सर्व तालुक्यांतील गरजूंना त्याचे निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वितरण करावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. भुजबळ फार्म येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

‘सकाळ’च्या वृत्ताची दखल

वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांसोबत अनेक नातेवाईक येताना दिसतात. त्यांच्यावर बंधन आणणे आवश्यक आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. ‘सकाळ’मध्ये यासंबंधाने आज प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल त्याद्वारे घेण्यात आली. श्री. भुजबळ म्हणाले, की बाधित रुग्णासोबत आलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यांच्यामार्फत इतरही लोक बाधित होतात. यावर निर्बंध आणण्यासाठी सर्व कोरोना रुग्णालयांच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या सोबत त्यांच्या नातेवाईकांना येण्यास सक्त मनाई करण्यात येऊन पोलिसांच्या मदतीने कोरोना रुग्णालय परिसरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात यावी.

पालकमंत्री : ऑक्सिजन टँकच्या नियमित देखभाल दुरुस्तीसह पर्यायी व्यवस्था करा

माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, कोरोना सांख्यिकी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, सहाय्यक संचालक माधुरी पवार, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.