esakal | रेमडेसिव्हिर संजीवनी नाही; कोविड फोर्सचे स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

remdesivhir
रेमडेसिव्हिर संजीवनी नाही; कोविड फोर्सचे स्पष्टीकरण
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत इंजेक्शन रेमडेसिव्हिरच्या गंभीर स्वरूपाच्या तुटवड्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. तसेच रेमडेसिव्हिर हे संजीवनी नाही, हेही स्पष्ट केले.

गैरसमज दूर करणे गरजेचे

रेमडेसिव्हिर इंजेक्शन जीवरक्षक म्हणजेच कोविडबाधित रुग्णाचे जीव वाचविणारे रामबाण AntiViral/ प्रतिविषाणू औषध आहे, असा जनमानसात असलेला गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. गैरसमजामुळे रुग्ण, नातेवाइक, ट्रीटमेंट करणारे डॉक्टर सर्वांवरच दबाव येत आहे. टास्क फोर्सच्या निर्देशांच्या आधारे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नाशिकमधील समस्त वैद्यकीय संघटनानी स्पष्ट केले आहे, की रेमडेसिव्हिर जीवरक्षक औषध नाही. आजाराच्या सुरवातीच्या काळात म्हणजे दोन ते नऊ दिवसांत दिलं गेलं तरच त्याचा उपयोग होतो नंतर नाही. योग्य वेळी दिल्यास या इंजेक्शनमुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये केवळ दोन दिवस कमी रहावं लागतं.

हेही वाचा: रक्ताचं नातं नसलं तरी माणुसकी कायम! तरूणांची पुण्याई,उपाशी नाही कुणी

केवळ तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टरांनीच ते ठरवावं,

इंजेक्शनमुळे व्हायरस/विषाणू रोग्याच्या शरीरात वाढण्याची प्रक्रिया थांबते. त्या मुळे हॉस्पिटल स्टे आणि नंतर प्रकृती सुधारण्यासाठी दोन दिवस कमी लागतात. इंजेक्शनशिवायही रुग्णाला वाचवता येतं. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णाला हे इंजेक्शन देता येणार नाही. टास्क फोर्स इंजेक्शन रेमडेसिव्हिरच्या अवाजवी, बेकायदेशीर वापराचा आणि साठेबाजीचा तीव्र विरोध आणि निषेध करते. कोविडबाधित रुग्णाला इंजेक्शन रेमडेसिव्हिर द्यावे की नाही, हे रुग्णाची ट्रीटमेंट करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरवणे महत्त्वाचे असेल. केवळ तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टरांनीच ते ठरवावं, असा आग्रहही टास्क फोर्स करीत असल्याचे टास्क फोर्सच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर अंतिम पर्याय नाही, गरजेलाच वापरा! - छगन भुजबळ