esakal | रेमडेसिव्हिर अंतिम पर्याय नाही, गरजेलाच वापरा! छगन भुजबळ

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal review meeting  in yeola
रेमडेसिव्हिर अंतिम पर्याय नाही, गरजेलाच वापरा! - छगन भुजबळ
sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : कोरोनाची लढाई आता लोकचळवळ व्हायला हवी, नागरिकांनीही आता सजग होण्याची गरज आहे. रेमडेसिव्हिर हे रुग्ण वाचविण्यासाठीचे अंतिम पर्याय असलेले औषध नाही. त्यामुळे गरज असेल, तरच त्याचा वापर करण्यात यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

गरज असेल तरच कोविड सेंटर गाठा

गृहविलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांची व्यवस्था घरी होत नसेल, तर त्यांना कोविड सेंटरला हलविण्यात यावे. गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांचीही नियमित तपासणी करण्यात यावी. विलगीकरण सेंटरची आवश्यकता असेल तर सेंटरची संख्या वाढविण्यात यावी. गावपातळीवरही टेस्टिंगची संख्या वाढविण्यात येऊन रुग्णांचे विलगीकरण करण्यात यावे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

आठ दिवस बाजार समित्या बंद ठेवाव्या

ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत योग्य नियोजन करण्यात यावे. मृत्युदर घटविण्यासाठी अथक प्रयत्न करावेत. मोठ्या बाजारपेठा सुरू राहिल्यास रुग्णसंख्या अधिक वाढत असेल, तर किमान आठ दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात याव्यात, असेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

येवला विश्रामगृहावर कोरोना आढावा बैठक

येथील विश्रामगृहावर येवला व निफाड तालुक्यांतील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, जिल्हा आरोग्याधिकारी कपिल आहेर, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी निखिल सैंदाणे, तहसीलदार प्रमोद हिले, तहसीलदार शरद घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकाडे, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, संदीप कराड, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, वसंत पवार, दीपक लोणारी, ज्ञानेश्‍वर शेवाळे, सुनील पैठणकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिकमध्ये रेमडेसिव्‍हिरचा पुन्हा काळाबाजार; पाच इंजेक्शनसह वॉर्डबॉय गजाआड