यवतमाळ : तिवसा येथे झाडावर चढून विरुगीरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरुगीरी

यवतमाळ : तिवसा येथे झाडावर चढून विरुगीरी

यवतमाळ: यवतमाळ-दारव्हा मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. रुंदीकरण करताना दारव्हा ते कामठवाडा दरम्यान एका बाजूचे वृक्ष तोडण्यात आले. तिवसापासून पुढे वृक्ष तसेच आहेत. त्यामुळे तिवसा गावानजीक चार ते पाच वृक्ष रस्ता रूंदीकरणामुळे रस्त्याच्या मधात आली आहेत. यामुळेच सहकार नेते सुभाष ठोकळ यांचे अपघातात निधन झाले. ही झाडे तोडण्यात यावी या मागणीसाठी बोरी खटेश्‍वर येथील उपसरपंच सतीश शेटे यांनी झाडावर चढून विरुगीरी केली.

तिवसागावानजीक चार ते पाच वृक्ष मार्गात आले आहे. यापूर्वी या ठिकाणी अपघात झाले. नागरिकांनी हे धोकादायक वृक्ष कापण्याची मागणी केली आहे. मात्र, संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याची नागरिकांची ओरड आहे. याच झाडामुळे दारव्हा तालुक्यातील सहकार नेते सुभाष मधुकरराव ठोकळ यांचा तीन एप्रिल तिवसा गावानजीक अपघात झाला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून झाडे तोडण्यासंदर्भात मागणी वाढली आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून अजूनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या झाडावर चढून आंदोलन केले.

झाड रस्त्याच्या मधात आले आहे. यामुळे एक जीव गेला. आणखी नागरिकांची जीव जाऊ नये म्हणून रस्त्यावर आलेली झाडे तोडण्यात यावी अशी मागणी सतीश शेटे यांची आहे. यासाठी त्यांनी तब्बल तीन तास झाडावर ठिय्या दिला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पंकज मुंदे, नितीन निघोट, राजू वनकर यांच्यासह चाणी, कामठवाडा, बोरी येथील नागरिक उपस्थित हेाते. घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिस घटनास्थळावर दाखल झाली. त्यांनी सतीश शेटे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलन मागणीवर ठाम होते. झाड तोडल्यानंतर आंदोलनाची भुमीका आंदोलकांनी घेतली होती.

Web Title: Yavatmal Virugiri Climbing Tree Tivasa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..