लग्नाचा बार उडाला पण संपूर्ण वऱ्हाडी मंडळी संकटात!

लग्नाचा बार भोवला!
wedding
weddingesakal

सिन्नर (जि.नाशिक) : प्रशासकीय यंत्रणेला अर्थातच अंधारात ठेवून या लग्नसोहळ्यासाठी गर्दी जमविली गेल्याची उघड चर्चा आता परिसरात रंगली आहे. विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना, तसेच यजमानांच्या कुटुंबात अनेकांना लग्न आटोपल्यानंतर दोन-चार दिवसांनी त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला...काय घडले नेमके?

सिन्नरला लग्नाचा बार भोवला!

गावात रंगलेल्या विवाह सोहळ्याबाबत सर्वांनी गप्प राहणे पसंत केले आहे.धुमधडाक्यात लग्नाचा बार उडविल्यानंतर सिन्नरच्या पूर्वेकडील मलढोण या गावात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. लग्नसोहळा असणाऱ्या घरातील, वऱ्हाडी मंडळींना कोरोना संसर्ग झाला असून, आठवडाभरात तब्बल २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अनेकांना लग्न आटोपल्यानंतर दोन-चार दिवसांनी त्रास जाणवू लागला. त्यात काहींनी वावी, सिन्नर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये तपासणी करून घेतली. स्थानिक पातळीवर उपचारदेखील घेतले. त्यानंतर गावातील अनेक जण ताप, सर्दी व खोकल्याच्या व्याधींनी ग्रासले. सुरवातीला चार, नंतर आठ, तर दोन दिवसांपूर्वी तब्बल दहा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची देखील चांगलीच धावपळ उडाली. असे असले तरी दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत चालली आहे.

wedding
कोरोना जाईना, लग्न ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा

आरोग्य केंद्रामार्फत तातडीच्या सर्वेक्षणाचे काम हाती

या लग्नसोहळ्यासाठी वावीच्या पूर्व भागातील अनेक गावांतील नागरिक उपस्थित असल्याचे बोलले जाते. या उपस्थितीमुळे परिसरातील गावांमध्येदेखील काही रुग्ण आढळल्याची चर्चा आहे. दरम्यान, मलढोण गावात एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने वावी आरोग्य केंद्रामार्फत तातडीच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिक आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत गावात सर्वेक्षण करण्यात येत असून, आजाराची लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तपासणी करून घेण्यासाठी आरोग्य केंद्रात जाण्याची सूचना करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी काही जण सिन्नर, संगमनेर येथील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, सौम्य लक्षणे असणारे बहुतांश रुग्ण घरीच थांबून उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com