Latest Marathi News | सिडकोतील विविध प्रभागातील विविध उद्याने मोजताय अखेरची घटका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garden News reference

Nashik News : सिडकोतील विविध प्रभागातील विविध उद्याने मोजताय अखेरची घटका!

नाशिक महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयांतर्गत उद्यान विभाग येतो. सहा प्रभागात ८४ हून अधिक उद्याने आहेत. या उद्यान विभागाच्या देखरेखित येतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून यातील ६० ते ७० टक्के उद्यानांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याचा प्रत्यक्ष घेतलेला लेखाजोखा आजपासून देत आहोत..

विकास बाविस्कर : सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : स्थानिक नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, बाळगोपाळ यांना विरंगुळा लाभावा यासाठी या शहरात शेकडो उद्यानांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र यातील अनेक उद्याने अखेरच्या घटका मोजताना दिसून येत आहेत. उद्यान साफसफाई तसेच उद्यानातील शौचालय असो यातील विविध कामांच्या देखरेखीची जबाबदारी उद्यानाच्या ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. उद्यान विभागाकडून दरमहा तसेच दरवर्षी या ठेकेदाराला साफसफाई तसेच देखरेखीचा मेंटेनेस दिला जातो. मात्र ठेकेदाराची बेपर्वाई अन्‌ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे उद्यानाची सद्यःस्थितीत दुरवस्था झाली आहे. (various parks in different sections of CIDCO neglected by nmc nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik News : गावगाड्याच्या निवडणुकीने राजकीय कुरघोड्या; गुलाबी थंडीत गावांमध्ये राजकारण तापले

माननीय स्व. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण व उद्यान

१) तुटलेल्या खेळणी

२) पथदिपकांची दुरवस्था

३) मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य

४) मद्यपींचा राजरोस धिंगाणा

५) सुरक्षा रक्षकाची नेमणूक गरजेची

६) ज्येष्ठ नागरिक सभागृहाची दुरवस्था

७) विविध प्रजातींची रोपे कोमेजलेली

८) जॉगिंग ट्रॅक वर पाणी मारणे गरजेचे

९) उद्यानातील काही भागांमध्ये मध्यांच्या पडलेल्या बाटल्या

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : पूर्व विभागात रुग्णालयासाठी मालेगाव स्टॅन्डवरील भांडार विभागाची जागा

परिसरवासीय म्हणतात...

"उद्यानाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली असून या आधी देखिल विभागीय अधिकाऱ्यांसह येथील पाहणी दौरा झालेला आहे. मात्र आजपर्यंत काहीही उपाययोजना झालेली नसून येथील साहित्य देखिल लंपास झालेलं आहे. येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहाची देखील दुरवस्था झालेली आहे." - कैलास चुंबळे, सामाजिक कार्यकर्ते.

"उद्यानाची अतिशय वाईट स्थिती असून वेळोवेळी मागण्या करूनही येथे काही उपाययोजना करण्यात येत नाही. रात्रीच्या सुमारास मद्यपींचा येथे मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ असतो. यामुळे येथे सीसीटीव्ही लावणे गरजेचे असून येथे दिवस व रात्रीसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे आवश्‍यक आहे." - अक्षय खांडरे, सामाजिक कार्यकर्ते

"उद्यानाची स्वच्छता होणे अत्यंत गरजेचे असून वेळोवेळी याबाबत उद्यान निरीक्षकांना देखील सांगण्यात येत असते. मात्र यावर काही उपाययोजना होत नाही. येथे मद्यपींचा मोठ्या प्रमाणावर वावर असून येथे एक सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे अत्यावश्यक झालेले आहे."

- कल्पना चुंबळे, माजी नगरसेवक

"उद्यानाच्या समस्यांबाबत प्रशासनास पत्र व्यवहार केलेले असून उपाययोजना होत नसल्याने आता उद्यानाची देखभाल करणाऱ्यांचे बिल थांबवायचे याबाबत आयुक्तांना निवेदन देणार आहे. उद्यान निरीक्षकावरच कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे."- प्रवीण तिदमे, माजी नगरसेवक

"उद्यानातील पथदिपकांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली असून सायंकाळच्या वेळेस येथे टवाळखोरांचा उद्रेक होत असतो. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकड्यांची देखील मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. प्रशासनाने महिन्यातून दोन महिन्यातून एकदा येथील पाहणी करणे अत्यावश्यक आहे." - तृषाली जगताप, गृहिणी

हेही वाचा: Nashik Traffic News : अबब! 3 किलोमीटर अंतरासाठी तब्बल पाऊण तास; दुतर्फा पार्किंगमुळे कोंडी

टॅग्स :NashiknmcGardencidco