Crime News: ताहाराबादजवळ जनावरांची सुटका; साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

Cruelly dumped animals in Eicher.
Cruelly dumped animals in Eicher.esakal
Updated on

जायखेडा (जि. नाशिक) : कत्तलीच्या उद्देशाने दोन वाहनांतून वाहतूक करीत असताना २५ गाई व ५ गोऱ्ह्यांची जायखेडा पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत आयशर व पिकअपसह अंदाजे १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकास अटक केली आहे. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी जायखेडा पोलिसांनी कारवाई केली. (Rescue of cattles near Taharabad Assets worth twelve half lakh seized Nashik Latest Crime News)

Cruelly dumped animals in Eicher.
SAKAL Exclusive : सावधान! 5G SIM Updateच्या नावाने बसतोय गंडा

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना अमानुषपणे कोंबून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व त्यांच्या पथकाने सापळा लावला. ताहाराबाद रस्त्यावर अवधूत पेट्रोल पंपाजवळ आयशर (क्र. एमएच- १८- एए- ०८४८) ताब्यात घेण्यात आली. तर दुसरी गाडी नामपूर- चिराई रस्त्यावर पिकअप (क्र. एमएच- ०४- डीके- ४६१८) बुधवारी (ता. १२) पहाटे दोनच्या सुमारास पकडण्यात आली.

या वेळी जायखेडा पोलिसांनी २५ गाई, ५ गोऱ्हे व आयशर, पिकअपसह अंदाजे १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रकचालक एकलाख अजीज शेख (वय ४५, रा. नेहरूनगर, नवापूर) याला अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या जखमी गुरांवर खासगी पशुवैद्यकीय अधिकारी नवलसिंग खैरनार यांनी उपचार करून त्यांना गोशाळेत पाठविले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलिस हवालदार सुनील पाटील, जितू पवार यांनी कारवाई केली.

Cruelly dumped animals in Eicher.
Nashik Crime News : मुले पळविणारे समजून तिघांना मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
The former Zilla Parishad school student has become an inspiration for rural and tribal students across Maharashtra.
Marathi News Esakal
www.esakal.com