esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Lasalgaon Rural Hospital

लासलगाव ग्रामीण रूग्णालयात अडकलेले 25 कर्मचारी सुखरूप बाहेर

sakal_logo
By
अरूण खंगाळ,लासलगाव

लासलगाव (जि. नाशिक) : मुसळधार पावसाने येथील ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात प्रचंड पाण्यामुळे वेढा पडल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी, रुग्ण असे पंचवीस जण अडकले होते. पाण्याची पातळी वाढत गेल्याने हे सर्व जण तेथेच अडकल्याने रात्री उशिरा त्यांना वेढ्यातून बाहेर काढण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अडीच तासांच्या प्रयत्नांती त्यांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

अंधार असल्याने पाण्याचा अंदाज नव्हता

लासलगाव परिसरात तुफान पाऊस झाल्याने साडेआठनंतर ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात पाणी हळूहळू वाढू लागले. रुग्णालयात असलेले आठ रुग्णांनी ताबडतोब रुग्णालयाच्या गच्चीचा आधार घेतला. बाजूला असलेल्या स्टाफ क्वॉर्टरमधील बारा कर्मचारीही निवासस्थानात चार ते पाच फूट पाणी जमा झाल्याने घराच्या गच्चीवर गेले होते, मात्र पावसाचा जोर कमी होत नव्हता.

तुफानी पावसाने वीजपुरवठाही खंडित झाला होता, त्यामुळे अंधारात पाण्याचा नेमका अंदाज येत नव्हता. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आहिरे यांनी लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून घटनेचे गांभीर्य सांगितले. राहुल वाघ व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर व वेदिका होळकर घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: नाशिक : राज्यात धर्मांतर परवानगीमुळे कुणालवर कारवाई अशक्य

अडीच तास चालले रेस्क्यू ऑपरेशन

पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांची सुटका करणे अवघड झाल्याने ताबडतोब जेसीबी हायवाच्या मदतीने क्वॉर्टरच्या गच्चीवर असलेल्या बारा कर्मचाऱ्यांना अडीच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सुखरूप बाहेर काढले.

विशेष बाब म्हणजे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व योगेश शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी पाच फूट पाण्यात स्टाफ क्वार्टरमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. तेथून पाण्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. शिवाजी घोडे, संदिप शिंदे, प्रदीप आजगे, देवा पानसरे, योगेश जामदार, दत्तू शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विशाल पालवे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील, अमोल थोरे, मिराज पठाण, सूरज नाईक, प्रतीक चोथानी, मयूर बोरा, अबजाद शेख, संदीप उगले, मयूर झांबरे, उमेश पारीक, प्रदीप त्र्यंबके, ओम चोथानी, सूरज आब्बड, शिवाजी जगताप, मधुर विस्ते, सागर आहिरे, मयूर गोसावी, रोहित शेरेकर, जीवन पगार, सोनू शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. पुरात अडकलेल्या वैद्यकीय कर्मचारींना येथील शिवकमल मंगल कार्यालयात रात्री आश्रय देण्यात आला. ओम चोथानी व प्रतीक चोथानी यांनी जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली.

हेही वाचा: मी 'भाई' युनिव्हर्सिटीमध्ये गेलो नाही; छगन भुजबळ कडाडले

loading image
go to top