
Nashik : व्यवसायिकांसह रहिवासी खंडित विजेने त्रस्त
येवला (जि. नाशिक) : महावितरणच्या कार्यालयालगत असूनही तकिया व थिएटर रोड परिसरात सातत्याने व तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यवसायिकांसह रहिवासी त्रस्त झाले आहेत. परिसरातील वीजेचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी व्यापारी व रहिवाशांनी केली आहे. (Residents along with businessman suffer from power cuts of MSEDCL Nashik Latest Marathi News)
महावितरणच्या शहर अभियंत्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तकिया व थिएटर रोड परिसरात तासन्तास वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज आली, तर कमी दाबाने येते.
तर काही वेळा अधिक दाबाने येते. त्यामुळे वीज उपकरणे नादुरुस्त होत आहेत. यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तकिया व थिएटर रोड परिसरातील वीजेचा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणीही निवेदनात केली आहे.
निवेदनावर नावेद शहा, रज्जब खान, अमिल कुसुंदल, अर्शद शहा, नासीर मोमीन, मास बेग, इस्तीयाक सय्यद, मुज्जमील शहा, अश्पाक अहमद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.