नाशिक : तब्बल 42 वर्षांनी रस्ता नशिबी...

Residents claim that the road has been built after 42 years nashik news
Residents claim that the road has been built after 42 years nashik newsesakal

इंदिरानगर (जि.नाशिक) : राजीवनगरमधील सुवर्ण कमल कॉलनीमधील रहिवाशांच्या नशिबी तब्बल ४२ वर्षांनी रस्त्याचे सुख आल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. आतापर्यंत कॉलनीमधील रस्त्यांची जागा महापालिकेकडे (NMC) हस्तांतरित होण्याचा अडथळा असल्याने या ठिकाणी महापालिकेतर्फे रस्तेच केले जात नव्हते. ८० च्या दशकापासून ही स्थिती होती, असे नागरिकांनी सांगितले.

हे अडथळे दूर झाल्यानंतर आमदार सीमा हिरे (Seema Hire) यांच्या हस्ते येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणा प्रारंभ झाला. माजी नगरसेवक सतीश सोनवणे (Satish Sonavane), ॲड. श्याम बडोदे, सचिन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. रस्त्यांची जागा हस्तांतरित होत नसल्याने नागरिकांनी अनेक वेळा नगरसेवकांकडे हेलपाटे मारले. मात्र, उपयोग झाला नाही. अखेर माजी नगरसेवक सतीश सोनवणे यांनी याबाबत पुढाकार घेऊन हे सर्व सोपस्कार पूर्ण करून घेतले आणि येथील एकत्रित दोनशे मीटर लांबी असलेल्या तीन रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणाचा (Concreting) प्रारंभ करून घेतला. नागरिकांनी श्री. सोनवणे यांचे आभार मानले.

Residents claim that the road has been built after 42 years nashik news
नाशिक : स्मार्टसिटीची २२ पैकी फक्त ८ काम पूर्ण; वर्षभर चालणार काम

नारायण काठे, धोंडू देवरे, अनिकेत सोनवणे, महेश गोरे, सचिन बाविस्कर, अरुण सोनवणे, सुदाम कोठावदे, राजेश जोशी, दीपक विसपुते, श्री. बल्लाळ, सूरज बोराडे, हेमंत सोनार, सुवासिनी रत्नपारखी, माधुरी रत्नपारखी, वैशाली देवरे, आशा गवळी, प्रतीक्षा बेदमुथा, कुसुम वझरे आदींसह येथील सर्व रहिवासी उपस्थित होते.

Residents claim that the road has been built after 42 years nashik news
नाशिकमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन; पाहा Photos

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com