Latest Marathi News | Mahindra Scorpio-Nच्‍या नोंदणीला प्रतिसाद; Bhavin Wheelsमध्ये वाहनाचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

all new Mahindra Scorpio-N

Mahindra Scorpio-Nच्‍या नोंदणीला प्रतिसाद; Bhavin Wheelsमध्ये वाहनाचे वितरण

नाशिक : रंबकरोडवरील भाविन व्हील्सच्या दालनात जिल्ह्यातील पहिल्या सात स्कॉर्पिओ-एन या गाडीचे वितरण सोमवारी (ता.२६) करण्यात आले. गाडीमधील उपलब्‍ध सुविधांबाबत ग्राहकांकडून यावेळी समाधान व्‍यक्‍त करण्यात आले.

भाविन व्हील्सचे प्रमुख अमिश शहा म्‍हणाले, की महिंद्रा परिवारात नवीन सदस्य दाखल झाला आहे. या एसयुव्‍हीच्‍या सुरवातीच्या मॉडेलची एक्स शोरूम किंमत ११ लाख ९९ हजार रुपये असून, २६ लाखांपर्यंतचे वाहन उपलब्‍ध असेल. हे वाहन सात रंगात आणि चार मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. (Response to registration of Mahindra Scorpio N Vehicle Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: कैलास मठात विद्यार्थ्यांना वेदाचे धडे; हिंदू संस्कृती पुढे नेण्याची परंपरा

भाविन व्‍हील्‍सचे विक्री व्‍यवस्‍थापक शिवजी पांडे म्‍हणाले, की अधिकतम पॉवर, जास्त ग्राउंड क्लिअरन्स तसेच सात व आठ सिटिंग क्षमता असलेल्या या एसयुव्‍हीमध्ये ६ एअरबॅग्स, एडीआरईएनओएक्‍स असलेली ही एसयुव्‍ही ग्राहकांच्या पसंतीस खरी उतरले. नवरात्री उत्‍सवानिमित्त ग्राहकांना वाहनाची वितरण करण्यात आले.

श्रीराम ढोमसे, महेश गुप्ता, गौरव मिश्रा, श्रीकांत वाघ, नितीन तांबोळी, सागर शिंदे, संदीपा शहा, किशोर वाघ यांना वाहन सूपूर्द करण्यात आले. याप्रसंगी नाशिक क्षेत्राचे विक्री व्‍यवस्‍थापक प्रतीक जैन, भाविन व्हील्सचे सरव्‍यवस्‍थापक राजन मल्लाह, विकास अहिरे, विशाल बारबंडे आदी उपस्‍थित होते.

हेही वाचा: Leopard skin smuggling case : संशयितांचा जामीन नामंजूर; कोठडीत वाढ