
Leopard skin smuggling case : संशयितांचा जामीन नामंजूर; कोठडीत वाढ
नाशिक : बिबट्याच्या कातडी विक्रीप्रकरणी वनविभागाने केलेल्या कारवाईत अटक केलेल्या तिन्ही संशयित यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. तिघांपैकी दोन संशयित यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तिसऱ्या संशयित यांच्याही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. सिद्धांत पाटील (वय २१, रा. सर्वेश्वर कॉलनी, कॉलेज रोड), रोहीत आव्हाड (वय १९, रा. एमएचबी कॉलनी, सातपूर) तर जॉन लोखंडे (वय २९, वनवसाहत, नाशिक) अशी सर्व संशयित यांची नावे आहे. (Leopard skin smuggling case Suspects bail denied Increase in custody Nashik crime Latest Marathi News)
२० सप्टेंबर रोजी कृषीनगर जॉगिंग ट्रक परिसरातील सायकल सर्कल जवळ वनविभागाने रचलेल्या सापळ्यात तिघा संशयित यांना बिबट्याची कातडी, रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. अटक करण्यात आलेले सर्व संशयित हे महाविद्यालयीन तरुण असून यातील एकाचे वडील हे वनविभागात कार्यरत आहे.
त्यामुळे या प्रकरणाला अधिक महत्त्व आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून पथकाने कातडीसह नीलगाय व चिंकाराची प्रत्येकी दोन शिंगे देखील जप्त केली होती. याप्रकरणात चौकशीत सदरची कातडी ही चोरीची संशयित यांनी सांगितली. २४ सप्टेंबर रोजी ह्या सर्वांना न्यायालयाने वनकोठडी सुनावली असता संशयित जॉन लोखंडे यास न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली तर इतर दोघा संशयित यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
हेही वाचा: DRDO क्षेत्रात Drone; घुसखोरीचा होईना उलगडा
त्यानंतर सोमवारी (ता.२६) संशयित जॉन लोखंडे ह्या न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तसेच इतर दोघा संशयित यांनी जामिनासाठी अर्ज केले असता या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता न्यायालयाने दोघा संशयित यांचा जामीन फेटाळून लावले. त्यामुळे सर्वांच्या न्यायलयीन कोठडीत वाढ झाली आहे.
कातडी चोरीचीच
सदर प्रकरणात विक्रीसाठी आणलेली कातडी ही पंधरा ते वीस वर्ष जुनी असल्याची प्राथमिक माहिती वनविभागाने दिली आहे. त्यामुळे सदरची कातडी ही चोरी केली असल्याची माहिती संशयित यांनी दिली आहे. त्यामुळे ही कातडी नक्की कोठून चोरी करण्यात आली आहे. या संबंधीच्या नोंदी वनविभागाकडून तपासण्यात येणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा गुंतागुंत अधिकच वाढत आहे.
हेही वाचा: Crime Update : विवाहित प्रेयसीची बदनामी; संशयिताला अटक