गडकिल्ल्यांसोबत प्राचीन मूर्तींचे पुनरुज्जीवन

Restoration of ancient idols along with forts by rohit Jadhav Nashik News
Restoration of ancient idols along with forts by rohit Jadhav Nashik Newsesakal

सटाणा (जि. नाशिक) : सुवर्णकारांचा व्यवसाय सांभाळून येथील प्रथितयश व्यापारी रोहित जाधव या तिशीतल्या युवकाने गडकिल्ले संवर्धनाचा छंद जोपासत तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे. रोहितने या जिगरबाज छंदाबरोबरच आता शहरातील पुरातन काळातील गणेश, हनुमान, देवी या प्राचीन मूर्ती कोरून त्या पुनरुज्जीवित (Restoration) करण्याचा एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. (Restoration of ancient idols along with forts by rohit Jadhav Nashik News)

रोहितच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. येथील देवमामलेदार यशवंत महाराज देवस्थान ट्रस्टच्या पिंपळेश्‍वर मंदिर परिसरातील शंभर वर्षे जुन्या काळातील गणेशमूर्तीला शास्रोक्त पद्धतीने झळाळी आणून संवर्धन करण्याचे काम दुर्गवीर रोहित जाधव या तरुणाने हाती घेतले आहे. रोहितच्या कलाकुसरतेने ही प्राचीन गणेशमूर्ती बोलकी करून दाखविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

Restoration of ancient idols along with forts by rohit Jadhav Nashik News
नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात मद्य पार्टी

पिंपळेश्‍वर मंदिर समूहातील गणपती बाप्पाच्या मूर्तीला गणेश भक्तांनी शेकडो वर्षांपासून शेंदूराचा लेप चढविल्यामुळे मूर्तीचे तेज कमी होऊन अस्तित्व धोक्यात आले होते. दुर्गवीर रोहित जाधवने पुढाकार घेऊन मूर्ती पूर्वीप्रमाणे देखणी बनविली. मूर्तीची पहिल्या दिवशी विधिवत पूजा करून नारळ पाण्याने अभिषेक केला. शुचिर्भूत मूर्तीवर दिवसभर लोण्याचा थर चढविल्यानंतर रात्री मुलतानी मातीचा लेप लावला. त्यामुळे दुसऱ्‍या दिवशी मूर्तीवरचे जुनाट शेंदूरचे थर मऊ पडल्याने कोरताना खपल्या निघू लागल्या. तिसऱ्‍या दिवशी पुन्हा मुलतानी माती व चंदन पावडरच्या मिश्रणाचा लेप चढवला. असे तीन दिवस केल्यानंतर या प्राचीन मूर्तीचा खरडून तीन ते चार किलो शेंदूर काढला. त्यामुळे गणपती मूर्तीचे डोळे, हाताचे बोटे, मुकूट, अंगावरचा शेला, पाय, सोंड, (मुशक) उंदीर हे सर्व अवयव अगदी स्पष्ट दिसायला लागले. गणेशमूर्ती नुकतीच प्राणप्रतिष्ठा केल्यासारखी प्रसन्न दिसत होती. त्यानंतर बेलतेलाने मूर्तीचे लेपन केले. या यशस्वी उपक्रमानंतर शहर व परिसरातील प्राचीन मूर्तींना नवे रूप देण्याचा प्रयत्न रोहित करणार आहे.

Restoration of ancient idols along with forts by rohit Jadhav Nashik News
Summer Update : नाशिकची अवस्था विदर्भ, खानदेशाप्रमाणे

रोहितने तालुक्यातील ३६ प्राचीन मूर्तींचा शेंदूर काढून प्रतिष्ठापना केली आहे. गडसेवकच्या माध्यमातून दहा वर्षांपासून रोहितने सहकाऱ्यांसह बागलाणमधील साल्हेर, मुल्हेर, चौल्हेर या गडकिल्ल्यांबरोबर खानदेशातील भामेर, पानखेडा, डांगशिरवाडे या गडांवर संवर्धन कार्य सुरू आहे.

बारव जिवंत करण्याची इच्छा

जलसंवर्धन करताना बारव संशोधन करून तालुक्यातील एक हजार ९० बारवांचा शोध घेऊन नोंद केली. दुष्काळी भागातल्या २३ बारव स्थानिकांच्या सहभागातून गाळ काढून जिवंत केल्या. लवकरच मुळाणे, मुल्हेर, चौगाव येथील पायविहीर जिवंत करणार आहेत. बारव जिवंत झाली, तर नदी जिवंत होते आणि त्या भागातील दुष्काळ कायमचा जातो, असा रोहितचा दावा आहे. जंगल संवर्धन करताना साल्हेर, उरणगिरी व इजमाने येथे एक हजार १०० दुर्मिळ झाडांची लागवड केली. मोहट (बिज्जू) व उदमांजर या दुर्मिळ प्रजातीच्या जंगली प्राण्यांच्या शिकारी थांबवून त्या प्रजातींचे संवर्धन केल्यामुळे या प्राण्याची संख्याही वाढली आहे.म

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com