नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात मद्य पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

liquor

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात मद्य पार्टी

जुने नाशिक : वर्षभरापूर्वी याच महिन्यात डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे दगावलेल्या २२ रुग्णांच्या घटनेमुळे रुग्णालय देशात चर्चेत होते. तर यंदा मद्य पार्टीच्या घटनेमुळे घेऊन चर्चेत आले आहे. मद्यपान आणि रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून रात्रीपासून ते पहाटेपर्यंत सुरू असलेले चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे रुग्ण हैराण झाले आहे. (Alcohol party at Dr Zakir Hussain Hospital Nashik)

कोरोना (Corona) काळात कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरलेले डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात मद्य पार्टी सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात एका चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. महापालिकेकडून अधिकृत परवानगी घेण्यात येऊन चित्रीकरण सुरू होते. असे असले तरी मद्यपानासाठी देखील परवानगी देण्यात आली होती का काय, अशा चित्र रुग्णालयात बघायलाच मिळाले. रुग्णालयाच्या आपत्कालीन बाह्यरुग्ण विभागात मद्याच्या बाटली, तसेच अन्य खाद्यपदार्थ आढळून आले. चित्रीकरणामुळे रुग्णांना त्रास जाणवत होता. शिवाय त्या ठिकाणी मद्य पार्टी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचा त्रासदेखील रुग्णांना जाणवला.

याबाबत माहिती घेतली असता, रुग्णालयातील सूत्रांकडून असे सांगण्यात आले, की ज्या कर्मचाऱ्याकडून मद्यपान करण्यात आले तो कर्मचारी महापालिकेचा असला तरी रुग्णालयाची त्याचा काहीएक संबंध नाही. पूर्वी त्याची या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती होती. बदलीनंतर त्याचा रुग्णालयाशी काही एक संबंध राहिलेला नव्हता. यासंदर्भात चौकशी सुरू असून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नितीन रावते यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले, की ते बाहेरगावी असून रुग्णालयात काय प्रकार घडला याची माहिती नाही मुख्यालयाकडून माहिती मिळू शकते.